विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील पुस्तक महोत्सवात सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन

विजयवाडा – येथे ९ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या ३३ व्या पुस्तक महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने तेलुगु आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथ, सात्त्विक उत्पादने अन् धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या पुस्तक महोत्सवात २८० प्रदर्शन कक्ष लावण्यात आले होते. सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला अनेक जणांनी भेट दिली.

पुस्तक महोत्सवात लावण्यात आलेले सनातन संस्थेचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने अन् धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन

 

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

१. एक जिज्ञासूंनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिल्यावर ‘सनातनच्या कक्षाचे वातावरण एकदम वेगळे असून येथे पुष्कळ चांगले वाटत आहे’, असे सांगितले.

२. एका जिज्ञासूने इंग्रजी भाषेतील ग्रंथ पाहून ‘हे सर्व ग्रंथ तेलुगु भाषेत प्रकाशित व्हायला हवेत. मी भाषांतरकार असून मी तुमचे ग्रंथ भाषांतरित करून देईन’, अशी इच्छा व्यक्त केली.

Leave a Comment