खोल श्वास घेणे, हे मनुष्यासाठी एक परिपूर्ण औषध !

श्वास हा आयुष्याचा आधार आहे. मन आणि जीवन यांमधील रहस्यमय दोरी आहे. श्वास, ज्याच्या आधारे कुणीही प्राणी आयुष्यात पाऊल ठेवतो. म्हणून शारीरिक संरचनेत श्वासाच्या गतीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे; कारण श्वासाची गती वाढल्याने शरिराचे तापमान वाढते. त्याला आपण अल्पायुचा संकेतांक म्हणू शकतो.

स्वतःचे चिरंतन हित साधण्यासाठी योगशास्त्राचा अभ्यास करा !

‘योगशास्त्र’ हा पुष्कळ विस्तृत आणि गहन विषय आहे. एका लेखात त्याची मांडणी करणे केवळ अशक्य आहे. मनुष्याला स्वतःचे चिरंतन हित साधायचे असेल, तर योगशास्त्राच्या अभ्यासाविना पर्याय नाही, हे निश्चित ! त्याची महती कळावी, या दृष्टीने हा लेखप्रपंच !

झोप कधी आणि किती घ्यावी ?

सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.

#Ayurved # आयुर्वेद : …आहार कधी आणि कसा घ्यावा ?

काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.

चतुर्विध आहार (आयुर्वेदाचा पाकमंत्र) !

जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू नये. तसे केल्यास अन्नपचन व्यवस्थित होत नाही; म्हणून जेवतांनाच आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.

निरोगी शरिरासाठी परिहाराविरुद्ध आहार घेणे टाळा !

आयुर्वेदीय आहारमंत्र’ या माझ्या पुस्तकात भोजनविधीची सविस्तर माहिती दिली आहे. भूक लागल्यावर हात स्वच्छ धुऊन उष्ण, ताजे, स्निग्ध पदार्थ एकाग्रचित्ताने आणि पोटात थोडी जागा ठेवून जेवावे, असे काही नियम आहेत. ते धाब्यावर बसवून घेतलेला आहार म्हणजे ‘विधीविरुद्ध आहार’ होय.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग्य वस्त्र : धोतर

धोतर शक्यतो पांढर्‍या रंगाचे असते. हे नेहमी घालावयाचे वस्त्र आहे. मुख्यतः पूजाकर्म, धार्मिक कार्य इत्यादींच्या वेळी वापरत असलेल्या कौशेयाच्या (रेशमाच्या) वस्त्राला सोवळे असे म्हणतात.

व्यायाम आणि योगासने यांचे मानवी जीवनातील महत्त्व !

‘व्यायाम आनंददायक आहे. शरिराच्या रचनेमध्ये आपले अवयव, स्नायू, हाडे, रक्तवाहिन्या, त्वचा, मेंदू, मज्जारज्जू आणि मज्जातंतू हे सर्व अंतर्भूत असतात. ‘शरीर सुदृढ असावे’, असे आपल्याला नेहमी वाटत असते; परंतु या सर्व अवयवांची कार्यक्षमता चांगली रहाण्यासाठी  व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाचे अनेक लाभ आहेत.

हिंदु धर्मशास्त्रामध्ये संसर्गजन्य आजार होऊ नये; म्हणून सांगितलेली स्वच्छतेविषयीची सूत्रे !

सहस्रो वर्षांपूर्वीपासून हिंदु धर्मशास्त्रामधील ग्रंथांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून रक्षण होण्यासाठी स्वच्छतेविषयीची अनेक सूत्रे सांगितलेली आहेत.

‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’सारख्या यंत्रांद्वारे अल्प वेळेत अन्न शिजवण्याच्या पद्धतींचे आहारावर दुष्परिणाम !

‘प्रेशर-कुकर’ आणि ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ या यंत्रांत निर्माण झालेली पोकळी रज-तमात्मक लहरींचे भोवरे आतल्याआत निर्माण करत रहाते. हे भोवरे अन्नघटकांमध्ये फेकले जात असतात.