हिंदु धर्मशास्त्रामध्ये संसर्गजन्य आजार होऊ नये; म्हणून सांगितलेली स्वच्छतेविषयीची सूत्रे !

सहस्रो वर्षांपूर्वीपासून हिंदु धर्मशास्त्रामधील ग्रंथांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून रक्षण होण्यासाठी स्वच्छतेविषयीची अनेक सूत्रे सांगितलेली आहेत. त्यातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

१. लवणं व्यञ्जनं चैव घृतं तैलं तथैव च ।
लेह्यं पेयं च विविधं हस्तदत्तं न भक्षयेत् ॥
– धर्मसिन्धु, पूर्वार्ध, परिच्छेद ३

अर्थ : मीठ (खारट पदार्थ), लोणचे-चटणी, तूप, तेल, तसेच चाटून खाण्याचे आणि पिण्याचे विविध पदार्थ हाताने दिले (वाढले) असता भक्षण करू नयेत.

२. अनातुरः स्वानि खानि न स्पृशेदनिमित्ततः ।
– मनुस्मृति, अध्याय ४, श्लोक १४४

अर्थ : निरोगी माणसाने विनाकारण नाक, कान आणि डोळे यांना स्पर्श करू नये.

३. अपमृज्यान्न चास्नातो गात्राण्यम्बरपाणिभिः ।
– मार्कण्डेयपुराण, अध्याय ३४, श्लोक ५२

अर्थ : एकदा परिधान केलेले वस्त्र धुतल्यानंतरच पुन्हा परिधान करावे. स्नानानंतर लगेच अंग पुसावे.

४. हस्तपादे मुखे चैव पञ्चार्द्राे भोजनं चरेत् ॥
– पद्मपुराण, सृष्टिखण्ड, अध्याय ४९, श्लोक ८६

अर्थ : हात, पाय आणि तोंड धुऊनच भोजन करावे.

५. नाप्रक्षालितपादो भुञ्जीत ।
– सुश्रुतसंहिता, चिकित्सास्थान, अध्याय २४, श्लोक ९८

अर्थ : पाय धुतल्याखेरीज काही खाऊ नये.

६. स्नानाचारविहीनस्य सर्वाः स्युः निष्फलाः क्रियाः ।
– वाधूलस्मृति, श्लोक ६९

अर्थ : स्नान आणि शुद्ध आचरणाखेरीज केलेली सर्व कार्ये निष्फळ होतात.

७. न धारयेत् परस्यैवं स्नानवस्त्रं कदाचन ।
– पद्मपुराण, सृष्टिखण्ड, अध्याय ४९, श्लोक ८५

अर्थ : दुसर्‍याने अंग पुसण्यासाठी वापरलेल्या पंच्याचा उपयोग करू नये.

८. अन्यदेव भवेद्वासः शयनीये नरोत्तम ।
अन्यद्रथ्यासु देवानामर्चायामन्यदेव हि ॥
– महाभारत, पर्व १३, अध्याय १६१, श्लोक ९१

अर्थ : हे नरोत्तमा, प्रवास करतांना, झोपतांना आणि पूजा करतांना वेगवेगळी वस्त्रे परिधान करावीत.

९. तथा नान्यधृतं धार्यम् ॥
– महाभारत, पर्व १३, अध्याय १६१, श्लोक ९०

अर्थ : तसेच दुसर्‍यांनी वापरलेले वस्त्र धारण करू नये.

१०.  नाप्रक्षालितं पूर्वधृतं वसनं बिभृयात् ।
–  विष्णुस्मृति, अध्याय ६४, श्लोक १३

अर्थ : एकदा परिधान केलेले वस्त्र धुतल्याखेरीज पुन्हा वापरू नये.

११. न आर्द्रं परिदधीत ।
– गोभिलगृह्यसूत्र, प्रपाठक ३, कण्डिका ५, वाक्य २४

अर्थ : ओले वस्त्र परिधान करू नये.

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारची सूत्रे शिकवण्याची कोणतीच व्यवस्था नाही. सूक्ष्म जीवजंतू असतात आणि त्याचा संसर्ग कोणत्या माध्यमांतून होतो, हे मायक्रोस्कोप नसतांनाही हिंदूंच्या ऋषिमुनींना ठाऊक होते, हे येथे तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.

वरील सर्व सूत्रांचे प्रतिदिन काटेकारपणे पालन केले, तर हिंदू संसर्गजन्य आजारांपासून कायमचे सुरक्षित राहू शकतील.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment