मराठीचा न्यूनगंड बाजूला सारून मराठी भाषेतच व्यवहार करा ! – अधिवक्ता श्री. विवेक भावे

आधुनिक वैद्य, अभियंते, वैज्ञानिक यांनीही मातृभाषेत शिक्षण घेऊनच यशाची शिखरे पादाक्रांत केली; म्हणून मराठीचा न्यूनगंड बाजूला सारून मराठी भाषेतच आपले शिक्षण आणि व्यवहार करावेत, असे आवाहन अधिवक्ता श्री. विवेक भावे यांनी एका कार्यक्रमात केले.

इये मराठीचिये नगरी !

‘संस्कृतनंतर मराठीसारखी समृद्ध, संपन्न आणि सात्त्विक भाषा नाही. तथापि आज मराठी जनांना स्वत:च्या भाषेचाच विसर पडत चालला आहे. ‘सर्व आहे तुजपाशी…’ असे असूनही आपण विनाकारण पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत आहोत. खरे तर प्रत्येकात मराठी भाषेचा अभिमान रूजणे आवश्यक आहे.

अखिल मानवजातीच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी धर्माधिष्ठित जीवनव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणे अनिवार्य !

आजच्या पिढीला मराठी भाषेतील विवेचनही कळत नाही. यावरून दिवसेंदिवस मानवाच्या बुद्धीला जडत्व येत आहे किंवा त्याच्या आकलनक्षमतेत वेगाने घट होत आहे, असे दिसून येते. याचे मूळ कारण आताच्या शिक्षणपद्धतीत दडले आहे.

मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी समाजातील संभ्रम !

अलीकडे भाषा संमिश्र होत चाललेली आहे, अशी तक्रार विशेषतः तरुणांची सतत चालू आहे. ती अधिकाधिक इंग्रजाळलेली आहे आणि त्यामुळे भ्रष्ट आहे, अशी ती प्रत्यक्ष तक्रार आहे.

इंग्रजाळलेली मराठी अर्थात् अद्याप दास्यवृत्ती !

वर्ष १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला, तरी आम्ही खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेतून आणि त्यांच्या इंग्रजीच्या दास्यत्वातून अद्याप मोकळे झालेलो नाही.

भाषेशी असलेले भावनिक नाते टिकवण्याची गरज !

भारतीय सुशिक्षित वर्गामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजीचे अवडंबर आहे. आपल्याकडे इंग्रजी बोलता येणे, हा हुशार असणार्‍या मानदंडांपैकी एक मानला जातो. तो अतिशय चुकीचा आहे.

समाजाचा सर्वांगीण विकास होईल, अशी साहित्यनिर्मिती करा !

आजचे संपूर्ण साहित्य स्त्रैण झाले आहे. यौनसंबंधाने विलक्षण प्रभावित झालेले आहे. अशा रुग्ण साहित्याने संस्कृती नष्ट होतेच होते आणि त्याबरोबर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रदेखिल.

इंग्रजीच्या तुलनेत मराठी खरी ज्ञानभाषा ! – प्रा. अनिल गोरे (मराठीकाका)

१९८५ पर्यंत भारतातील शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर झळकत होता. जसजसे इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे खूळ वाढत गेले, त्या प्रमाणात महाराष्ट्राने वरून खालच्या दिशेने झेप घेतली.

महाराष्ट्रात मराठी भाषेची दु:स्थिती

वर्ष १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. हिंदी भाषिकांनी आजही अभियांत्रिकी शिक्षण संपूर्ण हिंदी भाषेत देण्याची व्यवस्था केलेली आहे. इथे मराठी जनतेला हिंदी भाषिकांप्रमाणे त्यांची मातृभाषा ज्ञानभाषा वाटत नाही.