भारतातील महत्त्वाच्या संस्थांची संस्कृतमधील घोषवाक्य

 

१. भारत सरकार

‘सत्यमेव जयते ।’ म्हणजे ‘नेहमी सत्याचाच विजय होतो.’

 

२. लोकसभा

‘धर्मचक्र प्रवर्तनाय ।’ म्हणजे ‘धर्मचक्राला पुढे नेण्यासाठी.’

 

३. उच्चतम (सर्वाेच्च) न्यायालय

‘यतो धर्मस्ततो जयः ।’ म्हणजे ‘जिथे धर्म (न्याय) आहे, तिथे विजय निश्चित आहे.’

 

४. ऑल इंडिया रेडिओ

‘बहुजनहिताय बहुजनसुखाय ।’ म्हणजे ‘अनेकांच्या हितासाठी, अनेकांच्या सुखासाठी.’

 

५. दूरदर्शन

‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ म्हणजे ‘जे सत्य आहे तेच कल्याणकारी आणि सुंदर आहे.’

 

६. गोवा राज्य

‘सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ।’ म्हणजे ‘सर्वांचे कल्याण होवो, कुणी दुःखी असू नये.’

 

७. भारतीय जीवनविमा निगम

‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ म्हणजे ‘मी चरितार्थ चालवतो.’

 

८. डाक तार विभाग

‘अहर्निशं सेवामहे ।’ म्हणजे ‘आम्ही रात्रंदिवस सेवा करतो.’

 

९. श्रम मंत्रालय

‘श्रमेव जयते ।’ म्हणजे ‘श्रमाचाच विजय होतो.’

 

१०. भारतीय सांख्यिकी संस्थान

‘भिन्नेष्वेकस्य दर्शनम् ।’ म्हणजे ‘भिन्नतेत एकतेचे दर्शन.’

(संदर्भ : सामाजिक माध्यम)

Leave a Comment