आत्महत्या करण्याचा विचार करणार्‍यांनो, मनुष्यजन्माचे कारण लक्षात घेऊन आत्महत्येचा विचार करू नका !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘ईश्‍वराने मनुष्यजन्म दिला आहे, तर ईश्‍वरप्राप्ती व्हायला हवी. तसेच मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे’, या दोन कारणांसाठी होत असल्याने मृत्यूचा विचार करायचा नाही.’

 

मृत्यूनंतरचे जीवन दुःखदायक होऊ नये, यासाठी तरी साधना करा !

१. ‘प्रवासाला जायचे असले, तर ‘कुठे जायचे आहे’, हे ज्ञात असले, तरी आपण २-४ दिवस आधीपासून प्रवासाची तयारी करतो. ‘मृत्यूनंतरच्या प्रवासाला कुठे जायचे आहे’, हे मानवाला ज्ञात नसते, तरी मानव तो प्रवास दुःखदायक होऊ नये, यासाठीही साधना करत नाहीत, हे आश्‍चर्यकारक आहे !’

२. ‘जो जिवंत असतांना आनंदावस्था अनुभवत असतो, तो मेल्यावर तीच अनुभवत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातो, तेवढेच त्याला वाटते.’ यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment