श्रीलंकेच्या जाफना शहराजवळ असलेल्या नैनातीवू बेटावरील आणि ५१ शक्तीपिठांमधील एक असलेले नागपुषाणी देवीचे प्रसिद्ध मंदिर !

प्राचीन काळात ‘नैनातीवू’ला ‘नागद्वीप’ या नावाने ओळखले जात असे. येथील शक्तीपिठाच्या स्थानी देवीचे एक मंदिर आहे. त्या देवीचे नाव ‘नागपुषाणी देवी’ असे आहे.

सतना (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी शक्तीपीठ !

‘सतना, मध्यप्रदेश येथील रामगिरी पर्वतावर श्री शारदादेवीचे मंदिर आहे. श्रीविष्णूने शिवाच्या पाठीवर असलेल्या माता सतीच्या निष्प्राण देहाचे सुदर्शनचक्राने ५१ भाग केले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले, तेथे शक्तीपीठ निर्माण झाले.

गोंडा, उत्तरप्रदेश येथील श्री वाराहीदेवी !

गोंडा, उत्तरप्रदेश येथील मुकुंदनगर गावात श्री वाराहीदेवीचे मंदिर आहे. मंदिरात अतीप्राचीन वटवृक्ष असून त्याच्या फांद्या मंदिर परिसरात विस्तारलेल्या आहेत. श्री वाराहीदेवी उत्तरी भवानीदेवी या नावानेही ओळखली जाते.

हिंदूंचा पराक्रमी राजा विक्रमादित्य यांची कुलदेवी उज्जैन, मध्यप्रदेश येथील श्री हरसिद्धीदेवी !

उज्जैन, मध्यप्रदेश येथील प्रमुख मंदिरांमध्ये श्री हरसिद्धीदेवी मंदिराची गणना होते. ही देवी राजा विक्रमादित्याची कुलदेवी होती. प्राचीन काळी देवी ‘मांगलचाण्डिकी’ या नावाने ओळखली जात असे.

५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या पाटलीपुत्र (पटना) येथील बडी आणि छोटी पटन देवीची मंदिरे !

बडी पटन देवी आणि छोटी पटन देवी !  मानसिंह नावाचा राजा प्रथम पश्चिम द्वाराकडून आलेे म्हणून पहिले मंदिर बडी पटन देवी आणि नंतर पूर्व द्वाराकडून आले म्हणून छोटी पटन देवी मंदिर !

महाकवी कालिदास यांना दिव्य ज्ञान प्रदान करणारी उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री गढकालिकादेवी

लोककथेनुसार शाकुंतलम्, मेघदूत या ग्रंथांचे रचनाकार आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या सभामंडळातील नवरत्नांपैकी एक प्रमुख रत्न (प्रमुख व्यक्ती) महाकवी कालिदास यांची श्री गढकालिका देवी ही इष्ट देवी (उपासनादेवी) मानली जाते.

भारताच्या सीमांचे रक्षण करणारी जैसलमेर (राजस्थान) जिल्ह्यातील श्री तनोटमाता

वर्ष १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या वेळी मंदिरात अनेक चमत्कारिक घटना घडल्या. युद्धाच्या वेळी राजस्थान परिसरात घुसलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना हरवण्यात तनोटमाता मंदिराची भूमिका महत्त्वाची ठरली होती.

ज्योतिर्मय रूप असलेली काशी (उत्तरप्रदेश) येथील श्री ब्रह्मचारिणी देवी

काशीतील दुर्गाघाट येथे श्री ब्रह्मचारिणी देवीचे मंदिर आहे. श्री ब्रह्मचारिणी देवीचे रूप ज्योर्तिमय आणि भव्य आहे. देवीच्या एका हातात जपमाळ आणि दुसर्‍या हातात कमंडलू आहे.

५१ शक्तीपिठांपैकी एक असलेली श्रीक्षेत्र काशी (उत्तरप्रदेश) येथील श्री बंदीदेवी

श्रीक्षेत्र काशी येथील दशाश्‍वमेध घाटावर श्री बंदीदेवीचे मंदिर आहे. ही देवी ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे.

विश्‍वातील दुसरे सर्वांत मोठे शक्तिपीठ म्हणजे रजरप्पा (झारखंड) येथील श्री छिन्नमस्तिकादेवी !

झारखंडची राजधानी रांची येथून ८० किलोमीटर अंतरावर रामगढ जिल्ह्यात असलेल्या रजरप्पा गावामध्ये श्री छिन्नमस्तिका देवीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील प्राचिन मंदिरांपैकी हे एक असून भैरवी आणि दामोदर या नद्यांच्या संगमावर हे मंदिर वसलेले आहे.