ज्योतिर्मय रूप असलेली काशी (उत्तरप्रदेश) येथील श्री ब्रह्मचारिणी देवी

श्री ब्रह्मचारिणी देवीची पूजन केलेली मूर्ती !

श्री ब्रह्मचारिणी देवीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेऊया !

काशीतील दुर्गाघाट येथे श्री ब्रह्मचारिणी देवीचे मंदिर आहे. श्री ब्रह्मचारिणी देवीचे रूप ज्योर्तिमय आणि भव्य आहे. देवीच्या एका हातात जपमाळ आणि दुसर्‍या हातात कमंडलू आहे. या देवीच्या दर्शनाने परब्रह्माची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. शारदीय नवरात्रात दुसर्‍या दिवशी श्री ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या वेळी काशीसह अन्य ठिकाणांहून सहस्रो भक्त येथे दर्शनासाठी येतात.

मंदिरात श्री ब्रह्मचारिणी देवीच्या मूर्तीसह देवीच्या पादुका, शिवपिंडी, श्री सूर्यदेव, श्री अन्नपूर्णादेवी आणि श्री लक्ष्मीनरसिंह या देवतांच्या मूर्तीही आहेत.

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन मंदिरे, वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला या प्राचीन मंदिरे, वास्तू यांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment