काही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये
दुर्गा – श्री दुर्गामहायंत्र हे श्री भगवतीदेवीचे (दुर्गेचे) आसन आहे. नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करतात.
दुर्गा – श्री दुर्गामहायंत्र हे श्री भगवतीदेवीचे (दुर्गेचे) आसन आहे. नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करतात.
प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके…
गडियाघाटाच्या मातेचे मंदिर असे या मंदिराचे नाव असून गेल्या ५ वर्षांपासून या मंदिरात अखंड दिवा पेटत आहे. कालीसिंध नदीचे पाणी या दिव्यामध्ये घातल्यानंतर पाण्यावर तवंग तयार होतो आणि दिवा पेटतो.
बाकू – हे दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असल्यामुळे या मंदिराला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते. ही ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्तगणांमध्ये आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी १५ सहस्रांहून अधिक भाविक दर्शनाला येतात..
बलुचिस्तानमधील मुसलमान ५१ शक्तिपिठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेची पूजा करतात. सत्ताधिशांनी अनेक वेळा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु बलुच लोकांनी प्राणपणाने या मंदिराचे रक्षण केले आहे.
मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते.
प्राचीन भारतातील शिक्षणव्यवस्था ही वेदप्रमाणित आणि परिपूर्ण होती. विद्यार्थ्याचे कौशल्य पाहूनच त्याला शिक्षण दिले जाई. प्रत्येक कर्म ईश्वरप्राप्तीचे साधन असल्याचे मनावर बिंबल्यामुळे कर्मात कनिष्ठ वा उच्च असा भेद नसे.
बिल ड्युरांट म्हणतो, हिंदुस्थान ही आपल्या वंशाची मातृभूमी आणि संस्कृत ही युरोपीय भाषांची जननी आहे. ती आपल्या तत्त्वज्ञानाची जननी आहे.
प्रत्येकाच्या (दानव आणि मानव यांच्या) मनाची शक्ती वेगवेगळी असते. प्राणशक्ती, विचार आणि मन यांचा परस्पर संबंध आहे.
भारतात असे अनेक चमत्कार घडत आहेत; परंतु याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे सोपे आहे; तसे केले की, काही करावेच लागत नाही; परंतु सिद्ध करायचे झाल्यास मात्र अपार कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक घेत आहेत आणि देवाच्या कृपेला पात्रही होत आहेत.
