वैदिक धर्म आणि संस्कृती यांच्या उत्थापनासाठी तरूणांच्या सहभागाचे महत्त्व !

 

१. वैदिक धर्म आणि संस्कृती यांचा र्‍हास

‘गेल्या दोनशे वर्षांपासून वैदिक धर्म आणि संस्कृती यांना हीन लेखणारे शिक्षण, विकृत वाङ्मय, सत्याचा आपलाभ करणार्‍या नाना कपट योजना ! ती विषारी वेल आता प्रचंड मोहरली आहे. वैदिक संस्कृतीच्या वृक्षाला तिने सर्वांगाने घट्ट वेढून टाकले आहे. तो प्रचंड वृक्ष त्या विषाग्नीने सुकला आहे. जीर्ण-शीर्ण होतो आहे.

 

२. वैदिक धर्म आणि संस्कृती यांचा र्‍हास होण्यामागील कारणमीमांसा

भगवान मनु, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या या पावन देशात असे का घडावे ?

२ अ. ‘संकर’, हे त्याचे स्वच्छ उत्तर आहे.

२ आ. ‘हिंदू कोड बिला’ने हिंदूंचे नरडेच आवळले आहे. विवाहसंस्था मोडली. वारसा, दत्तक आदी मूल्यांचा चुराडा उडाला.

२ इ. समाजवादी (सेक्युलर) राज्यघटना अस्तित्वात येणे

भगवान मनूच्या लक्षावधी वर्षांच्या समाजव्यवस्थेचा उच्छेद करण्याकरताच समाजवादी (सेक्युलर) राज्यघटना अस्तित्वात आली. ते भडकलेले कोलीत हाती घेऊन या बेगुमान, भ्रष्ट, मदांध सत्ताधीशांनी देशभर आगी भडकवल्या आहेत.

 

३. लहान मुलांच्या संघटित प्रयत्नांनी हिंदु धर्माचा प्रचंड वृक्ष मोहोरणार असणे

ती विषाक्त लता या वैदिक संस्कृतीच्या प्रचंड वृक्षाला केव्हा उन्मळून टाकील, याचा नेम नाही. भारतातल्या लहान मुलांनाही ती विषारी आणि त्या प्रचंड भयंकर वेलीने संपूर्णपणे विळख्यात घेतलेला तो प्रचंड वृक्ष दाखवला पाहिजे. एक ना एक दिवस ती विषवेल तोडण्याकरता या देशातील लहान लहान मुलेही सरसावतील. पहाता पहाता ती वेल नष्ट होईल आणि तो हिंदु धर्माचा प्रचंड वृक्ष असा मोहोरेल, असा वाढेल की, समस्त विश्‍व त्याच्या छत्राखाली आश्रय घेईल !

संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१६

Leave a Comment