छत्रपती शिवाजी महाराज : मराठ्यांचा गौरवशाली इतिहास !

छत्रपती शिवाजींच्या काळात पातशाह्या आणि फितूर नागरिक हे शत्रू होते. आज चीन, पाकिस्तान, आतंकवादी, नक्षलवावादी आणि देशद्रोही असे शत्रू आहेत. यांवर विजय मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकला अन् कौशल्य यांचे विशेष महत्त्व आहे.

पोर्तुगिजांना सळो कि पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज !

छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने पोर्तुगिजांना ‘सळो कि पळो’ केेले, त्यांचे ते धारिष्ट्य आणि ती बेदरकार वृत्ती पोर्तुगीज पहात राहिले. त्यांच्यावर आक्रमण करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. संभाजी महाराज युद्धात उतरलेेले पहाताच व्हॉईसरॉयने हे युद्ध आपणाला महाग पडणार, याची खूणगाठ मनाशी बांधली.

कमळाच्या देठांपासून कागदनिर्मिती करणारे राजा भोज !

प्राचीन इजिप्तमध्ये पपायरस नावाच्या झाडापासून कागद बनवत, हे शाळेत आवर्जून शिकवतात; पण कागदनिर्मितीचा खरा इतिहास वेगळाच आहे. मावळा म्हणजे प्राचीन भारतातील ‘मालव’ प्रांत. त्याची राजधानी म्हणजे धार किंवा धारानगरी.

हिंदु सैन्याधिपती छत्रपती शिवाजी महाराज !

अनेक जण प्रश्‍न विचारतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती का ? शिवरायांनी कधीही, कुठेही मशीद बांधलेली नाही. लोकांची समजूत आहे की, त्यांनी मशिदींना इनामे दिली; पण शिवचरित्रविषयक मराठी, फारसी, पोर्तुगीज आदी सर्वच्या सर्व कागदपत्रांमध्ये त्यांच्या संदर्भात तसा कागदाचा एक कपटासुद्धा मिळालेला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती

  १. सेनानींनी गौरवलेले शिवाजी महाराज  १ अ. छत्रपती शिवाजी महाराज हे महान सेनानी !– औरंगजेब प्रत्यक्ष औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मृत्यूनंतर काढलेले हे उद्गार, ते एक महान सेनानी होते. त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि शौर्याने एक नवीन राज्य निर्माण केले. हिंदुस्थानातील प्राचीन राज्यांचे उरलेसुरले अस्तित्व मी माझ्या प्रचंड सेनादलांच्या साहाय्याने गेली १९ वर्षे न … Read more

वढू (जिल्हा पुणे) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीची छायाचित्रे !

छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारावा यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांच्या पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुळापूर (जि. पुणे) येथे टाकले.

रयतेचे हित जपणारी धार्मिक धोरणे राबवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

संत-महंतांच्या मठांना इनामे दिली. ब्राह्मणांनाही त्यांनी आदराचे स्थान दिले; मात्र ते चुकल्यावर त्यांच्या विरोधात कृती करण्यास मागे-पुढे पाहिले नाही.

पुरंदरची लढाई : एक कूटयुद्ध !

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी संकटांनी घेरलेले असतांना एकाकी शिवरायांनी दाखवलेली युद्धनीती राजांच्या यशाचा राजमार्ग तयार करते.