आदर्श व्यक्तीमत्त्व श्रीरामभक्त हनुमान !

सध्या ‘व्यक्तीमत्त्व विकास’ हा अगदी शाळकरी मुलांमध्येही प्रचंड आवडीचा विषय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्यक्तीमत्त्व विकासासाठी सहस्रो रुपयांचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचे चरित्र वाचले, तरीही आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल. तसेच व्यक्तीमत्त्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांच्या कार्यातून आपल्याला पहायला मिळेल. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

प्रभु श्रीरामांचा जन्म होण्यामागे अनेक उद्देश असणे !

‘रामचरितमानसनुसार, ‘हरिचा अवतार ज्या कारणामुळे होतो, ते तेवढेच एक कारण आहे’, असे म्हणता येत नाही.’ श्रीहरिच्या रामावतारामध्ये अशी ज्ञात आणि अज्ञात अनेक कारणे आहेत, जी विविध कल्पे-युग यांमध्ये प्रभु श्रीराम यांचा जन्म होण्यासाठी सुनिश्चित केली जातात.

शक्तिदेवता !

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय !

‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !

ज्वरशमन करण्याची आणि रोगनिवारण करण्याची शक्ति आदिशक्तीमध्ये आहे. मनुष्याने भक्तीभावाने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती केल्यास सर्व ज्वर आणि रोग दूर होतील. श्रीविष्णूने नारदाला ‘इंद्राक्षीस्तुति’ सांगितली. नारदांनी ती सूर्याला आणि सूर्याने ती इंद्राला सांगितली. इंद्राने ही स्तुती सचीपुरंदर ऋषींना सांगितली. अशा प्रकारे सचीपुरंदर ऋषींकडून हे स्तोत्र मनुष्यजातीला मिळाले.

रामभक्तशिरोमणी भरताची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

या लेखामध्ये आपण रामभक्त भरताची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पाहूया आणि ‘भरतासारखी निस्सीम रामभक्ती आमच्या हृदयात निर्माण होऊ दे’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया.

साडेसाती असलेल्यांनी करावयाचे उपाय

प्रत्येक मनुष्याच्या राशीत शनिदेव प्रवेश करून साडेसात वर्षे रहातो. त्यामुळे मनुष्याला जीवनात साडेसात वर्षे शनिदेवतेची पीडा सोसावी लागते. यालाच ‘शनिदेवतेची साडेसाती’, असे म्हणतात.

पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले थोर विठ्ठलभक्त श्री. रुक्मांगद पंडित

‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते.

सार्‍या जगाला प्रेरक आणि आकाशाहूनही थोर ठरलेली श्रीरामाची पितृभक्ती !

राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करायचे ठरवले, तेव्हा कौसल्या-सुमित्रेसह कैकेयी राणीलाही अत्यंत आनंद झाला होता.

आपत्कालीन स्थितीमुळे घराबाहेर पडण्यास मर्यादा येत असतांना श्रावण सोमवारी करावयाचे शिवपूजन !

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

नटराजची मूर्ती आणि तांडव यांचे परमाणूच्या उत्पत्तीशी संबंध

ऑस्ट्रिया वंशाचे अमेरिकी भौतिक शास्त्रज्ञ आणि दार्शनिक फ्रिटजॉफ कॅपरा यांनी भगवान शिवाच्या नटराज रूपातील तांडव नृत्याचे परमाणूची उत्पत्ती आणि विनाश यांच्याशी संबंध असल्याचे म्हटले आहे.