गुरुमंत्र

प्रस्तुत लेखात आपण ‘गुरुमंत्र’ याचा अर्थ, गुरुमंत्राचे महत्त्व तसेच दुसर्‍यात नामजप (साधना) चालू करून देण्यासाठी गुरूंमध्ये आवश्यक असलेले घटक, नाम देणार्‍याची आध्यात्मिक पातळी आणि दिलेल्या नामातील शब्दांचे महत्त्व यासारखी वैशिष्ट्यपूर्ण माहितीही जाणून घेऊया.

 

‘गुरुमंत्र’ या शब्दाचा अर्थ

गुरुमंत्रात मंत्र हा शब्द असला, तरी बहुधा शिष्याने कोणता नामजप करावा, ते गुरूंनी सांगितलेले असते.

 

 

 

गुरुमंत्र : महत्त्व

१. आई-वडिलांनी दिलेले नाव आणि गुरूंनी दिलेले नाम

अ. आई-वडिलांनी दिलेले नाव देहाचे, पिंडप्रकृतीचे आहे, तर गुरूंनी दिलेले नाव (नाम) तत्त्वाला अनुसरून आहे.

आ. आई-वडिलांनी आपल्याला दिलेले नाव संस्कारांनी आपण आपले म्हणतो. तसेच गुरूंनी दिलेले देवाचे नाम संस्कारांनी (नामजपाने) आपले वाटले पाहिजे.

इ. गुरूंनी दिलेले नाम ‘आपण कुणाचेतरी (गुरुतत्त्वाचे) आहोत’, असे दर्शवते. आई-वडिलांनी ठेवलेले आपले नाव विसरून देवाचे नाम हेच आपले वाटले पाहिजे.

ई. आई-वडिलांनी दिलेले नाव मुलगा पुढे चालवतो, तर गुरूंनी दिलेले नाम शिष्य पुढे चालवतो. (श्री अनंतानंद साईश बाबांना (सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांना) शिष्य आणि मुलगा असे दोन्ही म्हणायचे; म्हणून त्यांनी दोन्ही अर्थांनी नाव चालवले. त्यांच्या प्रकृतीला, देहाला ‘भक्तराज’ म्हणून नाव दिले आणि अंतरातून गुरुतत्त्वाच्या नामाची जागृती दिली.)

२. आवडीच्या देवतेचा नामजप आणि गुरूंनी सांगितलेला नामजप

आपल्या आवडीच्या देवाच्या नामाचा जप करण्यापेक्षा पुढील कारणांसाठी गुरूंनी सांगितलेल्या नामाचा जप करावा.

अ. आपल्या उन्नतीसाठी कोणते नाम घ्यावे, हे आपल्याला कळत नाही. ते गुरुच सांगू शकतात.

आ. आपल्या आवडीच्या देवाच्या मंत्राने केवळ सात्त्विकता वाढायला साहाय्य होते; तर गुरुमंत्राने निर्गुणापर्यंत जाता येते.

इ. गुरुमंत्रात नुसती अक्षरे नसून ज्ञान, चैतन्य आणि आशीर्वादही असल्याने उन्नती लवकर होते. त्या चैतन्ययुक्त नामाला ‘बीजमंत्र’ किंवा ‘दिव्यमंत्र’ म्हणतात. त्या बिजापासून फळ मिळण्यासाठी अर्थातच साधना करावी लागते.

ई. गुरूंवर श्रद्धा असल्याने आपण स्वतः ठरवलेल्या मंत्रापेक्षा तो जास्त श्रद्धेने घेतला जातो. तसेच गुरूंची आठवण झाली की, नाम घ्यायची आठवण होत असल्याने ते अनेकदा घेतले जाते.

उ. स्वतःच्या आवडत्या देवाचे नाम घेतांना थोडातरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव नसतो.

३. गुरुमंत्र मिळाला नसल्याने बरीच वर्षे साधना करूनही
रामगडवालेबाबा अडकणे आणि गुरुमंत्र मिळाल्यावर मुक्त होणे

१८० वर्षांहून अधिक वयाच्या रामगडवालेबाबांनी १०० वर्षांहून अधिक काळ साधना केली होती अन् गेली ५० वर्षे ‘बाबा’ म्हणून नर्मदेच्या ओंकारेश्वर परिसरातील लोक त्यांना ओळखत होते. त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची प्रचीती बर्‍याच जणांना येत असे. आमच्या (सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या) गुरूंचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) गुरुबंधू प.पू. भुरानंदबाबा यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या मेहताखेडी येथील कुटीची व्यवस्था त्यांचे शिष्य परमानंद हे पहातात. परमानंदांचे पूर्वाश्रमीचे नाव होते दिलीप. गेली पाच-सहा वर्षे रामगडवालेबाबांचा निवास बहुधा कुटीवर असायचा. परमानंद त्यांची सेवा करायचे. १९९६ च्या प्रारंभीपासून बाबांची प्रकृती ढासळली. खाणेपिणे जवळजवळ बंदच झाले. लघवी-शौचाला अंथरुणातच होऊ लागले. बर्‍याचदा ते म्हणायचे, ‘‘दिलीप, मैं तेरी जांघमें सो जाऊ क्या ?’’ परमानंद ‘‘हो’’ म्हणायचे. मग दोन-चार घंटे बाबा तसे झोपायचे. १६.८.१९९६ या दिवशी दुपारी चार वाजता ‘‘दिलीपको बुलाओ, दिलीपको बुलाओ ।’’ म्हणून बाबा ओरडले. ते ऐकून परमानंद लगेच त्यांच्याकडे गेले. बाबांनी त्यांना ‘‘पानी पिला’’ म्हणून सांगितले. त्यांना बसवून पाणी पाजल्यावर ते म्हणाले, ‘‘मैंने सिद्धमंत्रका जप करनेसे ये खेल हुआ; लेकीन मैंने गुरुमंत्र नहीं लिया । तू भुरानंदबाबाने दिया हुआ मंत्र एक टाईम सुना दे व मेरे मथ्थेपे हाथ घुमा ।’’ दिलीपने तसे केल्यावर ते म्हणाले, ‘‘अभी मुझे नीचे रख दे । हो गया खेल ।’’ त्यांना अंथरुणावर झोपवल्यावर त्यांनी लगेच प्राण सोडला. गुरुमंत्र मिळाला नसल्याने बरीच वर्षे साधना करूनही बाबा अडकले होते. तो मिळाल्यावर ते मुक्त झाले. अशा प्रकारे गुरुमंत्र मिळणे हे केवळ मानसिकदृष्ट्या महत्त्वाचे असते.

४. गुरुमंत्र मिळणे म्हणजे गुरुंनी आपले पूर्ण दायित्व घेतले असणे

`गुरुमंत्र देऊन गुरु शिष्याला मायेच्या पसार्‍यातून खेचून वर काढतात. तेवढे गुरुमंत्रात बळ असते. गुरुमंत्र हा गुरूंच्या संकल्पाच्या रूपात असल्याने आणि एकदा का गुरूंनी गुरुमंत्र दिला, म्हणजे त्यांनी आपले पूर्ण दायित्व घेतले असे असल्याने जीव आपोआपच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊ लागतो; मात्र गुरुमंत्राच्या साहाय्याने उन्नती करवून घेण्याचे क्रियमाणकर्म मात्र त्याने चोख पार पाडले पाहिजे, तरच गुरुमंत्राच्या साहाय्याने तो पुढे निर्गुणाची शिडी चढू शकतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, चैत्र कृ. २ (८.४.२०१२), स. ८.५७)

 

दुसर्‍यात नामजप (साधना) चालू करून देण्यासाठी
गुरूंमध्ये आवश्यक असलेले घटक

नामजप, सेवा, त्याग, दुसर्‍यांविषयी निरपेक्ष प्रेम (प्रीती), श्रद्धा इत्यादी घटक न्यूनतम ७० टक्के तरी असावे लागतात. (सर्वसाधारण व्यक्तीत हे घटक ० टक्के ते २ टक्के असतात.) अहंभाव ५ टक्के इतका अल्प असावा लागतो. (सर्वसाधारण व्यक्तीत तो ३० टक्के असतो.)

आध्यात्मिक पातळी आणि दिलेल्या नामातील शब्दांचे महत्त्व

नामजप देणार्‍याची आध्यात्मिक पातळी (टक्के)

दिलेल्या नामजपातील शब्दांचे महत्त्व (टक्के)

दिलेल्या नामजपातील शक्तीचे / चैतन्याचे प्रमाण (टक्के)

५० ३०
६० २० १०
७० (गुरु) १० ८०
८० (सद्गुरु) ९०
९० (परात्परगुरु) १००
१०० १००

वरील सारणीवरून हे लक्षात येईल की, अत्युच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांनी (उदा. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर) सर्वांना एकच (श्रीरामाचा) नामजप सांगितला, तरी तो करणार्‍यांचा पूर्ण लाभ का होतो. अल्प आध्यात्मिक पातळीच्या नाम देणार्‍यांनी योग्य ते नाम दिले पाहिजे, नाहीतर नाम घेणार्‍यांना एवढा लाभ होणार नाही. काही अत्युच्च आध्यात्मिक पातळीचे संतही निरनिराळ्या शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार निरनिराळा मंत्र देतात.

‘एकदा एकाला ‘जसे होईल तसे होईल’, हा गुरुमंत्र बाबांनी दिला होता ! अर्थात गुरुमंत्रातील शब्दांपेक्षा त्यामागचा गुरुसंकल्पच खरा महत्त्वाचा असतो.’

नाम देणार्‍याची आध्यात्मिक पातळी ७० टक्के ते ९० टक्के असली, तरी त्यांनी दिलेल्या नामातील चैतन्य/ शक्ती अधिक आहे, असेही वरील सारणीवरून लक्षात येईल. त्याचे कारण असे की, ७० टक्के ते ९० टक्के आध्यात्मिक पातळीच्या उन्नतांना त्यांच्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळीचे उन्नत साहाय्य करतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’

Leave a Comment