‘अधिवक्ता अधिवेशना’साठी आलेल्या बेंगळूरू, कर्नाटक येथील मान्यवर अधिवक्त्यांनी गोव्यातील रामनाथी आश्रम पाहिल्यावर दिलेले अभिप्राय

‘इतर ठिकाणांच्या तुलनेत आश्रमातील वातावरण अत्यंत वेगळे आहे. येथे शांतता आहे. येथे अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असून कोणालाही ती अनुभवायला येईल. मी यापूर्वी २ वेळा आश्रमात आलो होतो. या वेळी ‘पूर्णवेळ साधना करणार्‍यांची संख्या वाढली आहे’, असे मला दिसले.

सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर या आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासक आणि स्तंभलेखक पत्रकार दिवंगत अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १७ मे या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी अधिवक्त्या रामतीर्थकर (श्रीमती) यांच्यासमवेत शुभराय महाराजांच्या वंशज श्रीमती शुभांगी बुवा याही उपस्थित होत्या.

भादरा, हनुमानगड (राजस्थान) येथील प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

राजस्थानमधील भादरा, हनुमानगड येथील संत आणि अखिल भारतवर्षीय धर्मसंघ तथा स्वामी करपात्री फाऊंडेशनचे पीठाधीश्‍वर प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्य महाराज यांनी १२ मे या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला ह.भ.प. संजय कोटणीस यांची सहपरिवार सदिच्छा भेट

सांगली येथील संत प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव ह.भ.प. संजय कोटणीस, कनिष्ठ चिरंजीव श्री. धनंजय कोटणीस आणि कुटुंबीय यांनी ४ मे २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

मुंबईतील प्रतिष्ठित ज्योतिषी कनुभाई शास्त्री यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

बोरीवली येथील प्रतिष्ठित ज्योतिषी श्री. कनुभाई शास्त्री यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

कल्याण (ठाणे) येथील ‘श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठा’चे मठाधिपती श्री. अरुण सीताराम मोडक महाराज आणि त्यांचे शिष्य यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील ‘श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठा’चे मठाधिपती श्री. अरुण सीताराम मोडक महाराज आणि त्यांचे शिष्य यांनी १ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिषी तथा पुणे येथील ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर (वय ६३ वर्षे) यांनी २६ मार्च या दिवशी त्यांची पत्नी सौ. मेघना घाणेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली

सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत ! – स्वामी श्री धर्मदास महाराज

सनातनचे प्रदर्शन पाहून प्रसन्नता मिळाली. हे ग्रंथप्रदर्शन पाहून माझी भावजागृती झाली. सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत.

सनातनचे हिंदु धर्मजागृतीचे महान कार्य पाहून पूर्ण समाधान झाले ! – लक्ष्मण बेहरे, संघचालक, गोवा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक श्री. लक्ष्मण बेहरे यांनी १८ जानेवारी या दिवशी सनातनच्या येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

डिचोली,गोवा येथील माजी आमदार नरेश सावळ यांची सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

डिचोली येथील माजी आमदार श्री.नरेश सावळ यांनी ११ जानेवारी या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.