मुंबईतील प्रतिष्ठित ज्योतिषी कनुभाई शास्त्री यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

डावीकडून श्री. कनुभाई शास्त्री यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची माहिती सांगतांना श्री. प्रकाश जोशी

रामनाथी (गोवा) – बोरीवली येथील प्रतिष्ठित ज्योतिषी श्री. कनुभाई शास्त्री यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांना सनातनचे साधक श्री. प्रकाश जोशी यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अवगत केले. ही सर्व माहिती त्यांनी जिज्ञासेने जाणून घेतली. आश्रम पाहिल्यावर ते म्हणाले, ‘‘आश्रम फार छान आहे. आश्रमाच्या माध्यमातून सनातन धर्माचा अत्यंत चांगल्या प्रकारे प्रसार केला जात आहे. प्रत्येक साधक स्वतःच्या मनाची शुद्धी करत आहे. हे सर्व पाहून मी अंतर्प्रफुल्लित झालो आहे.’’ आश्रमाच्या परिसरात असलेल्या कमलपिठाकडे पाहून ते म्हणाले, ‘‘कमलपिठाची जागा ईशान्य आहे. येथे दिवा पेटवल्याने चांगली भरभराट होते.’’ जातांना त्यांनी ‘आश्रम पहायला पुन्हा एकदा वेळ काढून येतो’, असे सांगितले.

 

मी अधिवेशनात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला
विषय मांडण्याची संधी देईन ! – श्री. कनुभाई शास्त्री

या वेळी ज्योतिष विशारद असलेले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. राज कर्वे यांनी श्री. कनुभाई शास्त्री यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या अंतर्गत ज्योतिषशास्त्राविषयी चाललेल्या कार्याची माहिती दिली. यावर श्री. कनुभाई शास्त्री यांनी श्री. राज कर्वेे यांना ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही सूत्रांविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय ते म्हणाले, ‘‘मी अधिवेशन आयोजित करणार असून त्यामध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला विषय मांडण्याची संधी देईन.’’

 

श्री. कनुभाई शास्त्री यांचा अल्पपरिचय

श्री. कनुभाई शास्त्री हे ज्योतिषशास्त्रासह धार्मिक, कर्मकांड, जन्मक्षर आणि संगणक कुंडली यांत तज्ञ आहेत. त्यांचा हस्तसामुद्रिकेविषयीही अभ्यास आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक लोकांना लाभ झाला आहे. गुजरात राज्यातील जुनागड येेथील गिरनार पर्वतावर असलेल्या ‘श्री पंच दशनाम जुना आखाड्या’चे ते साधक आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment