तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे भक्त वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांचे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आगमन

महर्षींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य, त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि नातू श्री. आदर्श बालाजी (वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य यांची मुलगी सौ. अभिरामी यांचा मुलगा) यांचे १४ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सनातनच्या आश्रमात आगमन झाले.

श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्री महंत शांतिगिरी महाराज यांची पनवेल येथे सदिच्छा भेट !

सनातन संस्थेची विचारधारा चांगली असून सनातन संस्था आदरणीय आणि सन्माननीय आहे. संस्था उत्थानाचे कार्य करत आहे.

श्री नवनाथ महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांनी आरंभलेले कार्य पूर्ण होणारच आहे. तुम्ही त्यांचे चरण सोडू नका. तुम्हाला त्याचे फळ ते नक्कीच देतील.

सनातन संस्था वैदिक संस्कृतीचे पालन करणारी आदर्श संस्था ! – योगी अरविंद, ऋषिकेश

सनातन संस्था ही धर्माप्रती आदरभाव निर्माण करणारी आणि धार्मिक मूल्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी संस्था आहे. वैदिक सनातन संस्कृतीची जपणूक करणार्‍या या संस्थेचे समाजात अत्यंत मानाचे स्थान आहे. संस्थेच्या कार्यास माझ्या शुभेच्छा ! – योगी अरविंद, ऋषिकेश

हम्पी (कर्नाटक) येथील प्रसिद्ध चित्रकार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांची रामनाथी येथील सनातन आश्रमास सहकुटुंब भेट !

माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत अशी संस्था आणि सेवाभावी साधक मी कुठेही पाहिले नाहीत. यापुढेही मला कुठे हे पहायला मिळेल, असे वाटत नाही, असे उद्गार डॉ. व्यंकटेश तुळजाराम काळे यांनी आश्रम पहातांना काढले.

आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

शेतकरी कामगार पक्षाचे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला १५ फेब्रुवारीला सदिच्छा भेट दिली.

कर्नाटकमधील ज्ञानानंद आश्रमाचे स्वामी शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.

सनातन संस्थेचे कार्य मला मनापासून आवडते – अलका कुबल, अभिनेत्री

गणेश जयंतीनिमित्त चांदवड शहरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरात लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांनी सदिच्छा भेट दिली.

एक वेळ विम्याला पर्याय असेल; पण सनातनला नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गुणसुमने वेचलिया या भावे । की तिने सुगंधा व्हावे । जरी उद्धरणी व्यय तिचा न हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ॥ याप्रमाणे सनातन प्रभातची वाटचाल आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराचा अवतार ! – श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी, श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्र, बंटवाळ (कर्नाटक)

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ईश्‍वराचा अवतारच आहेत अन्यथा अशी अद्भुत संस्था स्थापन करणे शक्यच नाही’, असे गौरवोद्गार बंटवाळ तालुक्यातील येथील श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्राचे श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी यांनी काढले.