कळंबोली – येथील बिमा कॉम्प्लेक्स येथे सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथावर सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या विक्रीकेंद्राचे उद्घाटन सह्याद्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष वर्तक आणि भाजपचे पनवेल शहर चिटणीसपदावर श्री. अशोक मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. वर्तक यांनी सांगितले, सनातन संस्थेचे कार्य जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवे. तुम्ही साधक सर्वकाही सांभाळून कार्य करत आहात. तुमच्यामुळेच आम्हाला धर्मकार्यासाठी या माध्यमातून वेळ देता येतो. त्यांनी शिवजयंतीला उरण येथील त्यांच्या कार्यक्रमात सनातन संस्थेला विषय मांडण्यासाठी निमंत्रित केले. तसेच हे ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमस्थळी लावण्याची मागणी केली.
श्री. अशोक मोटे यांनी सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. आमच्या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे कार्यक्रम आयोजित करू, अशी प्रतिक्रिया दिली.
क्षणचित्र
प्रदर्शनाचे उद्घाटन शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले.

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
उप्पळा (केरळम्) येथील कोंडेवूर मठाचे मठाधीश्वर श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला...
सनातन आश्रमात मी अद्भुत अनुभूती घेतली ! – श्री भगवत शरण महंत राधाकृष्ण स्वामी
भारतीय संत महापरिषदेच्या संत समन्वयक स्वामिनी उन्मेष भारती यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !