सनातन संस्थेचे हिंदुत्व जागृतीचे कार्य योग्य असून प्रभावी आहे ! – ह.भ.प. जयराम हरि पुरंदरे

लखनऊ येथील कीर्तनकार ह.भ.प. विजय कृष्ण भागवत आणि ग्वाल्हेर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जयराम हरि पुरंदरे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

उजवीकडून कीर्तनकार ह.भ.प. विजय कृष्ण भागवत, कीर्तनकार ह.भ.प. जयराम हरि पुरंदरे आणि सौ. तारिणी पुरंदरे यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना श्री. विशाल देशपांडे

रामनाथी, गोवा – लखनऊ येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. विजय कृष्ण भागवत आणि ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जयराम हरि पुरंदरे यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीचे कार्य जाणून घेतले. या भेटीच्या प्रसंगी ह.भ.प. भागवत आणि ह.भ.प. पुरंदरे यांचा सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांच्या हस्ते हार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

सनातन संस्थेचे हिंदुत्व जागृतीचे कार्य योग्य असून प्रभावी आहे ! – ह.भ.प. जयराम हरि पुरंदरे

कीर्तनकार ह.भ.प. जयराम हरि पुरंदरे हे ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध संत पू. ढोलीबुवा महाराज यांचे पुतणे तथा वंशज आहेत. आश्रमाविषयी बोलतांना ह.भ.प. पुरंदरे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेने हिंदुत्व जागृतीकरता जे आध्यात्मिक कार्य हाती घेतले आहे, ते अतिशय योग्य असून प्रभावी आहे. सनातनचा आश्रम अप्रतिम आहे. समस्त भारतवासीय आणि विदेशी यांनी जर या आश्रमाला भेट दिली, तर त्यांचीही ईश्‍वराप्रती श्रद्धा दृढ होईल आणि तेही साधना करायला लागतील, असा मला विश्‍वास वाटतो.’’

कीर्तनकार ह.भ.प. विजय कृष्ण भागवत यांचा परिचय

कीर्तनकार ह.भ.प. विजय कृष्ण भागवत हे मूळचे वाराणसी येथील आहेत. सध्या ते लखनऊ येथे ग्रामीण विकास संचालनालय खात्यात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांनी वेद, गीता आदी विषयांवर देशात विविध ठिकाणी प्रवचने दिली आहेत. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जाणकार आहेत. त्यांना संगीत, अभिनय आणि धार्मिक क्षेत्रांत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वेदांतील प्राविण्यासाठी त्यांना उत्तरप्रदेश सरकारकडून वर्ष १९९३ मध्ये ‘वेद पंडित’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांना नुकतेच बृहन्महाराष्ट्र, देहलीच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment