घाटकोपर, मुंबई येथील संत पू. जोशीबाबा यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

पू. जोशीबाबा (डावीकडे) यांना आश्रमातील सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना श्री. सागर निंबाळकर

रामनाथी (गोवा) – घाटकोपर, मुंबई येथील पू. जोशीबाबा (पू. पराशर जोशीबाबा) यांचे ३ मार्च या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श लाभले. पू. जोशीबाबा यांना सनातनचे साधक श्री. सागर निंबाळकर यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.

पू. जोशीबाबा यांनी सनातनचा आश्रम अत्यंत आपुलकीने पाहिला. आश्रमातील विविध कार्याची माहिती जिज्ञासूपणे जाणून घेतली. त्यांनी त्यांचे आजोबा सद्गुरु जोशीबाबा (प.पू. दत्तात्रय जोशीबाबा) आणि त्यांचे वडील प.पू. जोशीबाबा (प.पू. विजय जोशीबाबा) यांचे सनातनचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी असलेले सख्य, त्यांचे परात्पर गुरु डॉक्टरांवरील प्रेम यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. या निमित्ताने पू. जोशीबाबा यांचा सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भेटवस्तू अर्पण करून सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी पू. जोशीबाबा यांचे भक्त श्री. प्रवीण भोसले, श्री. सतीश राऊत आणि श्री. दीपक कुबल हेही उपस्थित होते. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले आणि पू. (सौ.) योया वाले यांनीही पू. जोशीबाबा यांची आवर्जून भेट घेतली.

सनातनच्या मार्गदर्शनाखाली अनेक संत सिद्ध होणे, हे सनातनचे वैशिष्ट्य ! – पू. जोशीबाबा

आश्रम भेटीच्या वेळी पू. जोशीबाबा म्हणाले, ‘‘सनातनच्या माध्यमातून चालू असलेले सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधन, कलेचा ईश्‍वरप्राप्तीच्या दृष्टीने अभ्यास हे सर्व नावीन्यपूर्ण आणि समाजासाठी आवश्यक असे आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधक करत असलेली आध्यात्मिक प्रगती, सिद्ध होत असलेले संत हे सनातनचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. अध्यात्म कृतीत आणण्यासाठी आवश्यक असलेला समर्पणभाव साधकांमध्ये ठायीठायी आढळतो.’’

 

Leave a Comment