
ठाणे – परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे कार्य करत आहेत. सनातन संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे धर्मप्रसार आणि संस्कार यांचे कार्य, तसेच भारतात रामराज्य येणाच्या दृष्टीने करण्यात येणारे कार्य पुढे अधिक वाढण्यासाठी शुभेच्छा !, असे प्रतिपादन येथील एन्.के.टी. विद्यालयाचे अध्यक्ष शेठ नानजीभाई खिमाजीभाई ठाणावाला यांनी केले.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सनातनची ग्रंथसंपदा घेऊन मुलांना घडवण्याच्या दृष्टीने शिक्षकांसाठी कार्यशाळा ठेवणार असल्याचेही त्यांना आश्वासन दिले. त्यांच्या सचिवांना त्यांनी सनातनच्या साधकांची महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट करून देण्याविषयी सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मुकुंद घाणेकर, श्री. बळवंत पाठक आणि सनातनच्या सौ. स्मिता नवलकर उपस्थित होते. ठाणावाला यांना ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ आणि कुंभमेळ्याविषयीचे ग्रंथ देण्यात आले.
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !