संन्याशी स्वामी निर्मलानंद गिरी यांची सनातन संस्थेकडून सदिच्छा भेट

वाराणसीस्थित संन्याशी स्वामी निर्मलानंद गिरी यांची मलकापूर येथील महादेव टेकडी येथे असणा-या शिव मंदिरामध्ये सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले.

सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त ! – दत्ता जुवेकर, गणेशमूर्तीकार, गोवा

सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, असे उद्गार बेतुल, केपे येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर यांनी काढले.

कल्याण येथील भाजपच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अंजू अरोरा यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट

कल्याण येथील भाजपच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अंजू अरोरा यांनी त्यांच्या कुटुबियांसमवेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत आणि त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाणारच आहे ! – जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच सर्व कार्य होत आहे. तेच सर्वांचे प्रेरणास्रोत आहेत. आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत.

सनातन संस्थेच्या आश्रमात भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचे खर्‍या अर्थाने आचरण केले जाते ! – जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश

सनातनच्या आश्रमातील साधकांचा साधनेचा भाग पाहून डॉ. स्वामीजी यांनी देहली येथील एका संप्रदायाच्या १० ते १५ सहस्र भक्तांंसाठीच्या नियोजित कार्यक्रमाला जाण्याचे रहित केले .

वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र पंडित धर्मनारायण शर्माजी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन

२.८.२०१९ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने साधक श्री. राम होनप यांनी वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र आदरणीय पंडित धर्मनारायण शर्माजी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीदंडी स्वामी यांची सदिच्छा भेट

शक्तिपात संप्रदायाचे श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनृसिंह आश्रय यति (श्रीदंडी स्वामी) यांनी सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्याचे कौतुक करून ‘लवकरच हिंदु राष्ट्र येणार आहे’, असा आशीर्वाद दिला.

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे प.पू. देवबाबा यांनी २३ जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चैतन्यमय भेट दिली.

सनातन संस्थेचे कार्य जग व्यापेल ! – प.पू. आबा उपाध्ये यांचे आशीर्वचन

सनातन संस्थेच्या साधकांना होत असलेले वाईट शक्तींचे त्रास न्यून व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी आध्यात्मिक स्तरावर सातत्याने प्रयत्न करणारे पुणे येथील थोर संत प.पू. नरसिंह (आबा) उपाध्ये यांचे २१ जुलै या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात शुभागमन झाले.

कर्नाटकातील मणिपाल विद्यापिठातील मुख्य उपक्रम अधिकारी डॉ. अरुण शानभाग यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट

कर्नाटकातील सुप्रसिद्ध मणिपाल विद्यापिठातील मुख्य उपक्रम अधिकारी (चीफ इनोवेशन ऑफिसर) डॉ. अरुण शानभाग यांनी २० जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली.