सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीदंडी स्वामी यांची सदिच्छा भेट

श्रीदंडी स्वामी यांच्याशी बोलतांना सद्गुरु नंदकुमार जाधव सोबत श्री. ब्रह्मा अंकलेकर

जळगाव – शक्तिपात संप्रदायाचे श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनृसिंह आश्रय यति (श्रीदंडी स्वामी) यांची सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी भुसावळ येथे नुकतीच भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी स्वामीजींना सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याविषयी अवगत केले. या वेळी श्रीदंडी स्वामीजींनी सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्याचे कौतुक करून ‘लवकरच हिंदु राष्ट्र येणार आहे’, असा आशीर्वाद दिला. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच हिंदु राष्ट्र येणार आहे’, असा भाव स्वामीजींनी व्यक्त केला. या वेळी उपस्थित असलेले सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना स्वामीजींनी प्रसाद दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात