केंब्रिज टेक्सटाईलचे मालक मनोहर भाटिया यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट

डावीकडून सौ. रश्मी भाटिया, श्री. मनोहर भाटिया आणि सनातन नियतकालिकांची माहिती देतांना श्री. सुयोग आठवले

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – मुंबई येथील केंब्रिज टेक्सटाईल या आस्थापनाचे मालक तथा सनातनचे हितचिंतक श्री. मनोहर भाटिया आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी भाटिया यांनी ३० ऑगस्ट या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे श्री. सुयोग आठवले यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र अन् धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. या वेळी त्यांनी जिज्ञासूपणे सर्व माहिती जाणून घेतली.

 

अभिप्राय

श्री. मनोहर भाटिया – आश्रमातील सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर समाधान दिसले !

आश्रम पाहून अतिशय चांगले वाटले. सगळीकडे सकारात्मक ऊर्जा जाणवली. आश्रमातील सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर समाधान दिसले. अनेक नवीन गोष्टी जाणून घेता आल्या. सर्व जण प्रामाणिकपणे कार्य करत होते. हे सर्व पाहून आनंद वाटला.

सौ. रश्मी भाटिया – आश्रमात भारतीय संस्कृतीचा सुगंध अनुभवायला मिळाला !

आश्रमातील वातावरण अतिशय प्रेमाने भारलेले होते. सगळीकडे शांती जाणवत होती. सर्वांमध्ये एक आदर-सत्काराची भावना दिसली. येथे आपल्या भारतीय संस्कृतीचा सुगंध अनुभवायला मिळाला. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. संस्था संपूर्ण हिंदु संस्कृतीचे ज्ञान देते. आपण आपली मुले आणि नातवंडे यांना जागृत करणे आवश्यक आहे. त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान दिले पाहिजे, असे आश्रम पाहून वाटले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment