कल्याण येथील भाजपच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अंजू अरोरा यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट

कल्याण येथील भाजपच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अंजू अरोरा यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – कल्याण येथील भाजपच्या अल्पसंख्याक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अंजू अरोरा यांनी त्यांच्या कुटुबियांसमवेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनच्या कु. मिल्की अगरवाल यांनी आश्रमात चालणारे आध्यात्मिक संशोधन, तसेच राष्ट्र अन् धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. सौ. अरोरा यांनी जिज्ञासूपणे आश्रम पाहिला, तसेच साधनेविषयी माहिती जाणून घेतली. या वेळी ‘आश्रम पाहून मन पवित्र झाले’, असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘साधक आणि आश्रम यांमध्ये पुष्कळ सकारात्मकता जाणवते. येथे प्रत्येक जण आनंदी दिसतो आणि प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हास्य दिसते’, असेही त्या म्हणाल्या.

सौ. अरोरा यांना हिंदु धर्माविषयी अभिमान आहे. त्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकलेल्या अनेक हिंदु मुलींची सुटका केली आहे. त्यामुळे त्यांना अनेक न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागत आहे.

क्षणचित्रे

१. सौ. अंजू अरोरा आणि त्यांचे कुटुंबीय काही वेळासाठीच आश्रमात आले होते; परंतु  ते येथे ३ घंट्यांहून अधिक काळ थांबले.

२. सर्वांनी आश्रमातील स्वच्छता आणि कार्यपद्धती यांचे कौतुक केले. सौ. अरोरा यांना स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांसाठी साधक चुका लिहिण्याकरता वापरत असलेला फलक पुष्कळ आवडला. असा फलक त्यांच्या शाळेतही लावण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment