संपूर्ण विश्‍वात सनातन संस्थेसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे ! – वृंदावन आचार्य नित्यानंद गिरी महाराज

आचार्य नित्यानंद गिरी महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेल्या साध्वी हरिप्रियाजी महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

साधूंपेक्षाही सनातन श्रेष्ठ कार्य करत आहे ! – पू. फरशीवालेबाबा

पू. फरशीवालेबाबा यांनी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिल्यावर सनातनच्या कार्याचे कौतुक केले.

सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत ! – स्वामी श्री धर्मदास महाराज

सनातनचे प्रदर्शन पाहून प्रसन्नता मिळाली. हे ग्रंथप्रदर्शन पाहून माझी भावजागृती झाली. सनातन धर्माला वाचवण्याचे मोठे कार्य सनातनचे साधक करत आहेत.

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे ! – श्री प्रभु नारायण करपात्री

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे, असे आशीर्वचन काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिले.

सनातनचे साधक संतसेवेत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर संतसंगतीचा आनंद दिसून येतो ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज

सनातनच्या सर्व साधकांकडे पाहून पुष्कळ प्रसन्न वाटते. त्याचे कारण म्हणजे ते संतसेवेत असून संतसंगतीचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येत आहे, असे प्रतिपादन श्री रघुवीर महात्यागी खालसाचे श्री श्री १००८ श्री महामंडलेश्वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज यांनी येथे केले.

सनातनचे हिंदु धर्मजागृतीचे महान कार्य पाहून पूर्ण समाधान झाले ! – लक्ष्मण बेहरे, संघचालक, गोवा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक श्री. लक्ष्मण बेहरे यांनी १८ जानेवारी या दिवशी सनातनच्या येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातनचे ग्रंथ आणि फ्लेक्स यांचे प्रदर्शन पाहून भारावून गेलेल्या धर्मप्रेमीने टप्प्याटप्प्याने १०० महिलांना प्रदर्शन दाखवण्याचा केला निर्धार !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले असून या प्रदर्शनाला गुजरातमधील धर्मप्रेमी श्री. खेंगाडभाई डोडीया यांनी १६ जानेवारी या दिवशी भेट दिली.

सनातनचे ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य देशाला सुधारत आहे ! – महामंडलेश्‍वर श्री महंत श्री रामेश्‍वरदास महाराज

महामंडलेश्‍वर श्री रामेश्‍वरदास महाराज आणि त्यांच्या समवेत आलेले जम्मू येथील गोरक्षा दलाचे कार्य करणारे श्री. राजा भैय्या यांनी कुंभनगरीतील सनातनच्या राष्ट्र अन् धर्मजागृतीच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

सनातनने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो ! – शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वचन

‘सनातन संस्थेने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो. सनातन संस्थेकडून राष्ट्ररक्षणाचे कार्य होवो’, असे आशीर्वचन जगद्गुरु शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यावर दिले.

डिचोली,गोवा येथील माजी आमदार नरेश सावळ यांची सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

डिचोली येथील माजी आमदार श्री.नरेश सावळ यांनी ११ जानेवारी या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.