सनातनने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो ! – शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वचन

कुंभमेळा प्रयागराज २०१९

सनातन संस्थेसाठी संदेश देतांना शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज, समवेत श्री. अरविंद पानसरे

‘सनातन संस्थेने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो. सनातन संस्थेकडून राष्ट्ररक्षणाचे कार्य होवो’, असे आशीर्वचन जगद्गुरु शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यावर दिले. या वेळी साधू-संतांच्या स्वागतासाठी लावलेल्या हार्दिक स्वागताच्या फलकाकडे पाहून त्यांना आनंद झाला. साधकांनीही त्यांना वाकून नमस्कार केला.

 

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला साध्वी सरस्वतीजी यांची भेट

साध्वी सरस्वतीजी यांच्याशी संवाद साधतांना १. श्री. चेतन राजहंस आणि २. पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज, १६ जानेवारी (वार्ता.) – येथील कुंभमेळ्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सेक्टर १५, मोरी मार्ग येथे लावण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक यांच्या प्रदर्शनास छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या अध्यक्षा साध्वी सरस्वतीजी यांनी १४ जानेवारीला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांना सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेल्या कार्याची माहिती दिली. या वेळी साध्वी सरस्वतीजी म्हणाल्या, ‘‘मी अनेक संतांना ओळखत असून सनातनचे ग्रंथ प्रदर्शन पहायला मी त्यांना आमंत्रित करीन. सनातन हा माझाच परिवार आहे. तुम्हाला काही साहाय्य हवे असल्यास मला सांगा.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात