सनातनचे साधक संतसेवेत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर संतसंगतीचा आनंद दिसून येतो ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज

श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज (मध्यभागी) यांना प्रदर्शनाची माहिती देतांना श्री. अभय वर्तक (उजवीकडे)

प्रयागराज (कुंभनगरी), २० जानेवारी (वार्ता.) – सनातन धर्माचे रक्षण होण्यासाठी देशाला वाचवले पाहिजे. मुसलमान त्यांच्या मुलांची संख्या वाढवत आहेत; मात्र हिंदू ‘हम दो हमारा एक’ यातच अडकला आहे. असे राहिले, तर हिंदू अल्पसंख्यांक होतील. भारतात संतांची परंपरा आहे. या देशाला संतच वाचवणार आहेत. संत परंपरा चालणार कशी ? संतांविषयी भारतियांच्या मनात आस्था आहे. सनातनच्या सर्व साधकांकडे पाहून पुष्कळ प्रसन्न वाटते. त्याचे कारण म्हणजे ते संतसेवेत असून संतसंगतीचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे, असे प्रतिपादन श्री रघुवीर महात्यागी खालसाचे श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज यांनी येथे केले.

१७ जानेवारी या दिवशी त्यांनी कुंभनगरीतील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली, तर सनातनचे साधक श्री. नीलकंठ नाईक यांनी त्यांचा सन्मान केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात