आमची संस्था तुमचीच असल्याने सर्व साहाय्य करण्यास सिद्ध ! – प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज

प्रयागराज येथील वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्यात प.पू. डॉ. गुणप्रकाश
चैतन्यजी महाराज यांच्या भेटीने हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियानाला प्रारंभ !

१. प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांची भेट घेतांना २. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि ३. पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), ८ जानेवारी (वार्ता.) – येथील कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या जागृतीसाठी संपर्क अभियानाचा प्रारंभ ‘अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशन’चे प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर अन् पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु उपस्थित होते. संस्थेच्या वतीने महाराजांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०१९’ आणि हिंदी भाषेतील ‘पाक्षिक सनातन प्रभात’ भेट देण्यात आले. या प्रसंगी प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज म्हणाले, ‘‘आमची संस्था तुमचीच आहे. सर्व साहाय्य करण्यास आम्ही सिद्ध आहोत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात