सनातन संस्थेचे कार्य अद्वितीय आहे ! – श्री श्री १००८ श्री महंत काशीदास महात्यागी महाराज, मुंबई

श्री श्री १००८ श्री महंत काशीदास महात्यागी महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही घर, प्रपंच पाहून लोकांना धर्माच्या मार्गावर आणत आहात, हे मोठे यशस्वी कार्य आहे. सनातनसारख्या संस्थेची सध्या आवश्यकता आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हे शंकराचार्य अन् सर्व संत-महंत यांचे कार्य करत आहेत ! – महंत परमहंसदास महाराज

भगवान श्रीराम यांनी सत्तेचा त्याग करून रामराज्याची स्थापना केली होती. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षाने सत्ता पणाला लावून भारताला वाचवण्यासाठी त्याला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले पाहिजे, असे प्रतिपादन अयोध्या येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंसदास महाराज यांनी १० फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्थेचे प्रदर्शन उत्कृष्ट आहे ! – योगी शैलन्द्रनाथ, गोरखपूर, उत्तरप्रदेश

सनातनचे ग्रंथप्रदर्शन अतिशय उत्कृष्ट आहे. या प्रदर्शनातील ‘ढोंगी बुवा बाजी’संबंधी ग्रंथ मला पुष्कळ आवडला, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील योगी शैलन्द्रनाथ यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

गुरु हे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून ‘ज्ञान’ आणि ‘गुण’ उत्पन्न करून हिंदूंना देत आहेत ! – महंत श्री धर्मप्रकाशजी महाराज, सुलतानपूर, उत्तरप्रदेश

सनातन संस्थेने चांगले प्रदर्शन लावले आहे. सर्व हिंदूंनी म्हणजेच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी काय करायला हवे, हे या प्रदर्शनातून कळेल. सर्व क्षेत्रांत ज्ञान देण्यासाठी गुरु असतात, त्याप्रमाणे या प्रदर्शनातही सर्व माहिती देणारे गुरुच असून ते ज्ञान आणि गुण उत्पन्न करून हिंदूंना देत आहेत असे प्रतिपादन महंत श्री धर्मप्रकाशजी महाराज यांनी केले.

सनातनचे ग्रंथप्रदर्शनातील कार्य आमच्यासारख्या लोकांनी यापूर्वीच चालू करायला हवे होते ! – महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज, वृंदावन, उत्तरप्रदेश

सनातनचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे मन पुष्कळ प्रसन्न झाले. आमच्यासारख्या लोकांनी हे कार्य यापूर्वीच चालू करायला हवे होते. तुम्ही हे कार्य केले, ते पुष्कळ चांगले झाले. आम्ही तन, मन आणि धन यांनी तुमच्यासमवेत आहोत. या कार्याला अधिकाधिक पुढे नेले पाहिजे.

सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहिल्यानंतर हिंदूंना स्वतःवर होणार्‍या अन्यायाची जाणीव होईल ! – महंत श्री सुंदरदासजी महाराज

सनातनचे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर हिंदूंना आध्यात्मिक माहितीसमवेत त्यांच्यावर कशा प्रकारे आणि का अत्याचार होत आहेत, याची माहिती मिळेल. हे प्रदर्शन पाहून ‘आपल्यावर कशाप्रकारे अन्याय होत आहे’, याची हिंदूंना जाणीव होऊन त्यांच्यात जागृती होईल.

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनामुळे लोक धर्माचरण करू लागतील ! – स्वामी प्रेम परमानंद महाराज

उज्जैन येथील कल्याण आश्रमचे स्वामी प्रेम परमानंद महाराज यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक प्रदर्शनाला भेट दिली.

सनातनचे साहित्य, संशोधन आणि शिक्षण पुष्कळ उच्च प्रतीचे आहे ! – महामंडलेश्‍वर स्वामी दयानंददास महाराज, शक्तीधाम आश्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना महामंडलेश्वर स्वामी दयानंददास महाराज भेट यांनी दिली.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातील माहितीचा अभ्यास करून हिंदू धर्माचरण करतील ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर माँ सतीगिरीजी

रिद्वार येथील त्रिलोकीनाथ विश्व सेवा संस्थान आणि १०८ फिट दुर्गा मूर्ती आश्रमाच्या श्री श्री १००८ श्री महामंडलेश्वर माँ सतीगिरीजी यांनी ११ फेब्रुवारीला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली.

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून चांगले कार्य होत आहे’ – श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज

हरिद्वार येथील कनखल मधील श्री पंचायती निर्मला आखाड्याचे श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला भेट