
सातारा – संत भक्तराज महाराज यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अत्यंत महान असून खर्या अर्थाने राष्ट्र अन् धर्म रक्षणकर्ते आहेत. येणारा काळ हा अत्यंत वाईट असून गुरुदेव साधक आणि समाज यांच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. तसेच हिंदु समाजाचे संघटन करून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे महान कार्य त्यांच्याकडून लीलया करवून घेत आहेत. परात्पर गुरु केवळ सनातन संस्थेचे संस्थापक असले, तरी ते अखिल विश्वाचे आहेत. सनातन संस्थेचे महत्त्व शब्दांत सांगता येणार नाही. सनातन संस्थेचे कार्य अवर्णनीय आणि समाजाला दिशा देणारे आहे, असे गौरवोद्गार औंध (जिल्हा सातारा) येथील प.पू. हिरापुरी महाराज मठाचे मठपती पू. श्यामपुरी महाराज यांनी काढले.
सातारा येथे १६ जुलै या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता सातारा-कोरेगाव रस्त्यावर असलेल्या वेदभवन मंगल कार्यालय येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘गुरुपौर्णिमा महोत्सव २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या प्रसारासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी वडूज येथील सनातन संस्थेचे साधक श्री. हंसराज पटेल आणि श्री. रामभाऊ गोडसे उपस्थित हाते. पू. श्यामपुरी महाराज यांनी सनातन संस्थेच्या साधकांची भेट झाल्यावर विशेष आनंद झाल्याचे सांगितले. तसेच सनातन संस्थेच्या पुढील कार्याला शुभाशीर्वाद दिले.
श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !
सनातन धर्मयुगाच्या स्थापनेसाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा
भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्या महापुरुषाला माझे नमन ! – भागवत भास्कर आचार्य...
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे...
सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज...
अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !