संतांविषयी ऐकून होतो; परंतु संत निर्माण करणारी एखादी संस्था कधी पाहिली नव्हती ! – ह.भ.प.सुहासबुवा वझे

रामनाथी येथील सनातन आश्रमातील गुुरुपौर्णिमा महोत्सवात वक्त्यांचे सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार

ह.भ.प. सुहासबुवा वझे

सनातन आश्रम,रामनाथी (गोवा) – मी संतांविषय ऐकून होतो; परंतु संत निर्माण करणारी एखादी संस्था कधी पाहिली नव्हती. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधक संतपदापर्यंत पोचत आहेत.संतपदी विराजमान झालेल्या साधकांची संख्या ऐकून चांगले वाटले.सनातन संस्था समाजासाठी पुष्कळ चांगले कार्य करत आहे.सनातन संस्थेच्या या कार्याची मी माहिती घेत असतो.सनातन संस्थेच्या आश्रमात साधक निस्वार्थीपणे कार्य करत असतात.गुरूंची महती मोठी आहे.सनातन संस्थेच्या कार्यासाठी मी कुठेही यायला सिद्ध आहे आणि यासाठी मला निमंत्रण द्यायचीही आवश्यकता नाही.सनातन संस्थेच्या कार्याला विरोध होतो,हे ऐकून वाईट वाटते.सत्कार्याला विरोध करणे,हे महापाप आहे.लोक काय म्हणतात?,याला महत्त्व नाही,तर देव काय म्हणतो?,याला महत्त्व आहे.सनातन संस्थेने आपले कार्य चालूच ठेवावे.आपण खाणे,पिणे,टीव्ही पहाणे यांमध्येच अधिक वेळ घालवत असतो.आपण हा वेळ वाचवून अधिकाधिक नामजप आणि साधना करणे आवश्यक आहे.देवाने आम्हाला सर्वकाही दिलेले आहे,तरीही आपण त्याचे नाव घेत नाही,ही शोकांतिका आहे.

या महोत्सवात सकाळच्या सत्रात सद्गुरु (सौ.)बिंदा सिंगबाळ यांनी गुरुपूजन केले,तर पूजनाचे पौरिहित्य श्री.दामोदर वझे यांनी केले.यावेळी १० वी इयत्तेत चांगले गुण संपादन केलेला बोकडबाग,बांदोडा येथील आर्पीआर्एस् विद्यालयाचा विद्यार्थी श्री.स्मीत कांबळी यांचा सौ.लता ढवळीकर यांच्या हस्ते सत्कार केला.महोत्सवाला सनातन संस्थेच्या संत पू.(श्रीमती)सुमन नाईक (सुमन मावशी),पू.(श्रीमती)राधा प्रभु,बालसंत पू.भार्गवराम प्रभु, पू.महेंद्र क्षत्रीय,पू.सीताराम देसाई, पू.(सौ.)मालती देसाई यांची वंदनीय उपस्थिती होती.तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ.चित्रा फडते या उपस्थित होत्या.महोत्सवाला २६० जिज्ञासूंची उपस्थिती लाभली.

 

फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून देश-विदेशांत
१३ भाषांत १ लाख २५ सहस्र जिज्ञासूंपर्यंत गुरुपौर्णिमा महोत्सवाचा विषय पोचला !

यंदाच्या वर्षी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी,हिंदी,कन्नड भाषा,तसेच इंग्रजी आणि नेपाळी या विदेशी भाषा,अशा एकूण १३ भाषांत फेसबूक लाइव्हच्या माध्यमांतून गुरुपौर्णिमा महोत्सवांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.या माध्यमांतून देश-विदेशांतील १ लाख २५ सहस्र जिज्ञासूंपर्यंत गुरुपौर्णिमा महोत्सवाचा विषय पोचला. देशभरात ५५ सहस्र लोकांनी गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून पाहिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment