कर्नाटकातील मणिपाल विद्यापिठातील मुख्य उपक्रम अधिकारी डॉ. अरुण शानभाग यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहपरिवार भेट

डावीकडून श्री. रूपेश रेडकर, श्री. दीपेन मनोज सोलंकी, सौ. मानसी शानभाग, डॉ. अरुण शानभाग, कु. मीरा शानभाग आणि आध्यात्मिक संशोधनाविषयी माहिती देतांना ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे श्री. शॉन क्लार्क

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा –  कर्नाटकातील सुप्रसिद्ध मणिपाल विद्यापिठातील मुख्य उपक्रम अधिकारी (चीफ इनोवेशन ऑफिसर) डॉ. अरुण शानभाग यांनी २० जुलै २०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली. या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. रूपेश रेडकर यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य अन् आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. या वेळी त्यांनी आश्रम, अध्यात्म, आध्यात्मिक पातळी आदी गोेष्टींविषयी जिज्ञासेने जाणून घेतले, तसेच आश्रमात पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या अध्यात्माविषयीच्या कार्यशाळेविषयी त्यांनी जिज्ञासेने जाणून घेतले. डॉ. शानभाग यांनी ‘विद्यापिठांमध्ये ‘अध्यात्मशास्त्र’ या विषयाचा अभ्यासक्रम चालू करायला हवा’, अशी इच्छा व्यक्त केली.

 

सनातन संस्थेचा आश्रम अतिशय सुंदर आणि सुखदायक वाटला ! – डॉ. अरुण शानभाग

सनातन संस्थेचा आश्रम अतिशय सुंदर आणि सुखदायक वाटला. आश्रमात एवढे साधक सेवारत आहेत, हे कौतुकास्पद आहे. साधकांचा सेवाभाव पाहून अत्यानंद झाला. आश्रमाला भेट देता आली आणि या सर्व साधकांना भेटता आले, याचा आनंद वाटतो. आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे संग्रहालय पाहून माझी जिज्ञासा जागृत झाली असून त्रासदायक आणि चांगल्या शक्तींविषयी अधिक जाणून घ्यायला हवे, असे वाटले.

 

भगवद्गीतेचा अभ्यास करणारे डॉ. शानभाग

डॉ. अरुण शानभाग अमेरिकेतील सुप्रसिद्ध हावर्ड विद्यापिठात १९ वर्षे प्राध्यापक होते. गेल्या १० वर्षांपासून ते भगवद्गीतेचा अभ्यास करत आहेत. त्यातूनच त्यांना अमेरिकेतील सुखवस्तू जीवनाचा त्याग करून भारतात परत येण्याची प्रेरणा मिळाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment