रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. श्री. विजय डोंगर पवार (अध्‍यक्ष, आशापुरी मंदिर देवस्‍थान), स्‍टेशन रोड, शिंदखेडा, तालुका शिंदखेडा, जिल्‍हा धुळे, महाराष्‍ट्र.

अ. ‘साधक स्‍वतःकडून झालेली चूक फलकावर लिहितात’, हे मला अप्रतिम वाटले.

आ. आश्रमाच्‍या आत प्रवेश करतांना ‘तीर्थ अंगावर शिंपडून पवित्र होणे’, ही कृतीही मला पुष्‍कळ आनंद देऊन गेली.’

२. श्री. मनोज सुभाष जोहरी, तालुका तळोदा, जिल्‍हा नंदुरबार, महाराष्‍ट्र.

अ. ‘आश्रम पाहून माझ्‍या मनाला शांती मिळाली.

आ. आश्रमात नियोजनबद्ध आणि निःस्‍वार्थ भावनेने महान कार्य चालू आहे.

३. श्री. रोहित मनमोहन सूर्यवंशी (‘मेंबर ऑफ द ग्रोइंग बड्‍स फाउंडेशन’), तालुका तळोदा, जिल्‍हा नंदुरबार, महाराष्‍ट्र.

अ. ‘आश्रम पाहून एकदंरीत वाटले, ‘देव, देश आणि धर्म यांचे कार्य एकाच ठिकाणी चालू असलेला हा आश्रम किंवा धर्मवास्‍तू आहे.’

४. श्री. अशोक खंडेलवाल (विश्‍वस्‍त, श्री लक्ष्मीनारायण संस्‍थान), अचलपूर, तालुका परतवाडा, जिल्‍हा अमरावती, महाराष्‍ट्र.

अ. ‘आश्रमातील कार्य पाहून मला भरून आले.

आ. ‘येथील सर्व कार्य पाहून माझी ऊर्जा वाढली,’ असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.६.२०२३)

५ . अधिवक्‍ता प्रवीणचंद्र जंगले, जळगाव

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून मला अत्‍यंत प्रसन्‍न वाटले आणि माझे मन उल्‍हसित झाले. मला पुष्‍कळ आनंद झाला.

आ. फारच सुंदर ! ‘अशा प्रकारे आध्‍यात्मिक क्षेत्रात कार्य होऊ शकते’, याचे मला आश्‍चर्य वाटले.

इ. ‘चांगले नियोजन आणि व्‍यवस्‍थापन अशा प्रकारे सेवाभावी कार्यातून होते’, हे मला प्रत्‍यक्ष पहाता आले. पुष्‍कळ आभार !’

६ . श्री. शशिकांत कृष्‍णा पाटील, खोपोली, जिल्‍हा रायगड.

अ. ‘या वेळी मला रामनाथी आश्रमात आल्‍यानंतर पुष्‍कळ प्रसन्‍न वाटले.

आ. मला आश्रमात येण्‍याची ओढ लागली होती.’

७. श्री. प्रशांत रवींद्रनाथ जाधव (श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान), सातारा

अ. ‘रामनाथी आश्रम पहातांना मला सकारात्‍मक ऊर्जा मिळाली.’ (सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)

 

आश्रमातील ‘संशोधन’ आणि ‘संगीत’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) (टीप) पाहून मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

टीप – हे एक सॉफ्‍टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्‍ट्ये दाखवता येतात.

१. अधिवक्‍ता प्रवीणचंद्र जंगले, जळगाव

अ. ‘पी.पी.टी. पहातांना मला वाटले, ‘हे सर्व केवळ अद़्‍भुत आहे !’

आ. ‘सूक्ष्म सूत्रांचा विचार करून अशा प्रकारे संशोधन करता येते’, याचे ज्ञान मला मिळाले.’

२. श्री. शशिकांत पाटील, खोपोली

अ. ‘पी.पी.टी. शास्‍त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध केल्‍यामुळे माझ्‍या बुद्धीला विषयाचे लगेच आकलन झाले.’

Leave a Comment