वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव 2023 मध्ये सनातन संस्था सहभागी !

राज्‍यघटनेद्वारे भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित करणे आवश्‍यक ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

मागील ७५ वर्षांत हिंदूंना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवण्‍यात आले. केवळ संत, महात्‍मे यांच्‍या कृपेने भारतात अद्यापही धर्म टिकून आहे. ‘सेक्‍युरिझम’ (धर्मनिरपेक्षता) या शब्‍दामुळे हिंदूंना धर्मशिक्षण देण्‍याचा मार्ग बंद करण्‍यात आला आहे. धर्मनिरपेक्ष व्‍यवस्‍था म्‍हणजे अधर्मी व्‍यवस्‍था आहे. वर्ष १९१९ मध्‍ये ‘प्‍लेसेस ऑफ वर्शीप अ‍ॅक्‍ट’द्वारे (‘धार्मिक स्‍थळे कायदा १९९१’द्वारे) अयोध्‍येतील श्रीराम मंदिर वगळून सर्व मंदिरे वर्ष १९४७ मध्‍ये ज्‍या स्‍थितीत आहेत, त्‍या स्‍थितीत ठेवण्‍याला मान्‍यता देण्‍यात आली. यामुळे काशी येथील विश्‍वनाथ मंदिरासह सहस्रावधी मंदिरे मुक्‍त करण्‍यात बाधा निर्माण झाली आहे.

चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

त्‍यामुळे भारताला पुन्‍हा हिंदु राष्‍ट्र करण्‍यासाठी आंदोलन, संसद आणि न्‍यायव्‍यवस्‍था या लोकशाहीने दिलेल्‍या मार्गांनी आवाज उठवणे आवश्‍यक आहे. वैद्यकीय शिक्षण घेतले असूनही जोपर्यंत प्रमाणपत्र प्राप्‍त होत नाही, तोपर्यंत ‘डॉक्‍टर’ म्‍हणून मान्‍यता प्राप्‍त होत नाही. त्‍याप्रमाणेच हिंदुबहुल व्‍यवस्‍था असली, तरी राज्‍यघटनेद्वारे भारत ‘हिंदु राष्‍ट्र’ घोषित होणे आवश्‍यक आहे.

 

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ग्रंथांचे लोकार्पण !

डावीकडून भागवताचार्य (अधिवक्‍ता) श्री. राजीवकृष्‍णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पूज्‍य संत श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी, अधिवक्‍ता (पू.) हरिशंकर जैन आणि महंत दीपक गोस्‍वामी

या वेळी व्‍यासपिठावरील मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ या सनातनच्‍या ग्रंथमालिकेतील ‘साधना प्रत्‍यक्ष शिकवण्‍याच्‍या पद्धती’ या हिंदी आणि मराठी भाषेतील ग्रंथांचे भागवताचार्य (अधिवक्‍ता) श्री. राजीवकृष्‍णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पूज्‍य संत श्रीराम ज्ञानीदास महात्‍यागी, अधिवक्‍ता (पू.) हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्‍वामी यांच्‍या शुभहस्‍ते लोकार्पण करण्‍यात आले.

Leave a Comment