दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी आलेल्या धर्माभिमान्यांना रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना आलेली अनुभूती

 

 

१. धर्माभिमानी श्री. किरण कुलकर्णी यांनी श्री भवानीदेवीला
हात जोडल्यावर सर्व धर्माभिमानी अधिवेशनाला आलेले पाहून देवीला पुष्कळ आनंद
झाल्याचे त्यांना जाणवणे आणि ‘देवीने फुलाच्या रूपाने त्याला दुजोरा दिला आहे’, असे वाटणे

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी आलेले काही धर्माभिमानी रामनाथी आश्रम पहाण्यासाठी आले. त्या वेळी आश्रमाच्या परिसरातील श्री भवानीमातेचे दर्शन घ्यायला गेल्यावर कोल्हापूर येथील धर्माभिमानी श्री. किरण कुलकर्णी यांनी देवीला हात जोडून नमस्कार केला. तेव्हा देवीच्या मूर्तीजवळ असलेले एक फूल खाली पडले. त्यावर श्री. कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मी नमस्कार करण्यासाठी हात जोडले, तेव्हा मला जाणवले, ‘देवीला या हिंदु राष्ट्र अधिवेशनानिमित्त आलेले सर्व धर्माभिमानी पाहून पुष्कळ आनंद झाला आहे’ आणि ‘प्रत्यक्षात देवीने फुलाच्या रूपाने त्याला दुजोरा दिला आहे’, असे मला वाटले.’’

 

२. ‘देवीने हिंदु राष्ट्राच्या कार्याला आशीर्वाद दिला’, अशी अनुभूती तिन्ही धर्माभिमान्यांना येणे

श्री. किरण कुलकर्णी, कोल्हापूर; श्री. रोडमल गहलोत, अध्यक्ष (विश्व हिंदु परिषद), चंद्रपूर आणि अधिवक्ता सुनील सिद्धेश्वर नाईक, विश्वस्त (सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळ, कोल्हापूर) या तिन्ही धर्माभिमान्यांना ते दृश्य पाहून पुष्कळ आनंद झाला आणि ‘देवीने त्यांना, तसेच हिंदु राष्ट्राच्या कार्याला आशीर्वाद दिला असल्याची आम्हाला अनुभूती आली’, असे ते म्हणाले.

 

३. ‘तिन्ही धर्माभिमान्यांमध्ये पुष्कळ भाव असल्याने त्यांच्यातील
भावामुळेच त्यांना देवीने ही अनुभूती दिली आणि अधिवेशनाच्या
पहिल्याच दिवशी देवीने आशीर्वाद दिल्याचे स्थुलातूनही सांगितले’, असे मला वाटले.’

 

– कु. कविता निकम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

 

आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेला अभिप्राय

‘प्रत्येक वेळी आश्रमात काहीतरी नवीन आणि सकारात्मक पालट घडत असतात’, याची प्रचीती आजही आली. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती पाहून माझे मन प्रसन्न झाले. आश्रमात मला प्रभामंडल, तसेच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा यांविषयीची महत्त्वाची माहिती मिळाली.’ – डॉ. विजय श्रीरंग जंगम, कार्याध्यक्ष -प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, मुंबई

Leave a Comment