कुंभक्षेत्र प्रयागचे माहात्म्य

कुंभमेळा
कुंभमेळा

प्रयाग (अलाहाबाद) हे उत्तरप्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र अशा ‘त्रिवेणी संगमा’वर वसलेले तीर्थस्थान आहे. गंगा अन् यमुना या नद्या दृश्य आहेत; पण सरस्वती नदी अदृश्य आहे. या पवित्र संगमामुळेच याला ‘प्रयागराज’ किंवा ‘तीर्थराज’ असे म्हटले जाते.

 

१. व्युत्पत्ती अन् अर्थ

प्रयाग हा शब्द ‘प्र’ उपसर्गपूर्वक ‘यज्’ या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ ‘मोठा यज्ञ करणे’, असा आहे. ‘प्रयाग’ हे नाव अर्थपूर्ण आणि वेदांइतके प्राचीन असल्याने भाविकांनी या क्षेत्राला ‘अलाहाबाद’ या परकीय आक्रमकांनी दिलेल्या नावापेक्षा ‘प्रयाग’ असेच संबोधावे.

 

२. क्षेत्रमाहात्म्य

२ अ. प्रजापतिक्षेत्र

हरवलेले चारही वेद परत मिळाल्यावर प्रजापतीने या ठिकाणी एक महायज्ञ केला होता; म्हणून प्रयागला ‘प्रजापतिक्षेत्र’ असेही म्हणतात.

२ आ. पाच यज्ञवेदींतील मध्यवेदी

ब्रह्मदेवाच्या कुरुक्षेत्र, गया, विराज, पुष्कर आणि प्रयाग या पाच यज्ञवेदींपैकी प्रयाग ही मध्यवेदी आहे.

२ इ. त्रिस्थळी यात्रेपैकी एक

काशी, प्रयाग अन् गया या त्रिस्थळी यात्रेपैकी एक असलेल्या प्रयागचे स्थान धार्मिकदृष्ट्या अद्वितीय आहे.

२ ई. प्रलयकाळी सुरक्षित रहाणारे क्षेत्र

महाप्रलय होऊन सर्व जग बुडाले, तरी प्रयाग बुडणार नाही. प्रलयाच्या अंती श्रीविष्णु येथील अक्षयवटावर शिशूरूपाने शयन करील, तसेच सर्व देव, ऋषी आणि सिद्ध येथे वास्तव्य करून या क्षेत्राचे रक्षण करतील, असे या क्षेत्राचे माहात्म्य सांगितले आहे.

२ उ. विविध धर्मग्रंथांत वर्णिलेले माहात्म्य

२ उ १. ऋग्वेद

गंगा-यमुना या दोन नद्या एकत्र मिळतात, त्या ठिकाणी स्नान करणार्‍यांना स्वर्ग मिळतो (आणि) जे धीर पुरुष त्या संगमात तनुत्याग करतात, त्यांना मोक्षप्राप्ती होते.

२ उ २. पद्मपुराण

अ. ज्याप्रमाणे ग्रहांमध्ये सूर्य आणि नक्षत्रांमध्ये चंद्रमा श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व तीर्थांमध्ये प्रयागराज सर्वोत्तम आहे.

आ. गंगा-यमुनेच्या संगमावर पंचाग्निसाधन करणार्‍या भाविकाला सदेह स्वर्गप्राप्ती होते.

इ. या ठिकाणी पितरांचे श्राद्ध करून कपिला गायीचे दान केल्यास भाविकाला पुढील जन्मी साम्राज्य मिळते.

ई. पुत्रकामना असलेल्याने प्रयागतीर्थात स्नान केल्यास त्याचा तो मनोरथ पूर्ण होतो.

२ उ ३. कूर्मपुराण

प्रयाग हे तीनही लोकांतील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे, असे कूर्मपुराणात म्हटले आहे.

२ उ ४. महाभारत

प्रयाग हे सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याचे माहात्म्य श्रवण केल्यास, नामसंकीर्तन केल्यास अथवा तेथील मातीचे अंगाला लेपन केल्यास मनुष्य पापापासून मुक्त होतो.

 

३. तीर्थयात्रेतील विधी

प्रयागराजची तीर्थयात्रा करतांना त्रिवेणीसंगमाचे पूजन, केशमुंडन, गंगास्नान, पितृश्राद्ध, सौभाग्यवती स्त्रियांचे वेणीदान आणि देवतांचे दर्शन घेणे एवढे आवश्यक विधी करायचे असतात.

 

४. अक्षयवट

हा प्राचीन अन् पवित्र वटवृक्ष प्रयाग येथील यमुनेच्या काठावर आहे. वायू, मत्स्य, कूर्म, पद्म, अग्नी अन् स्कंद या पुराणांमध्ये ‘अक्षयवटाजवळ देहत्याग केल्याने मोक्ष मिळतो’, असे सांगितले आहे.

अक्षयवट, प्रयाग
अक्षयवट, प्रयाग

४ अ. हिंदूंना मोक्षमिळू नये, यासाठी प्रयाग येथील
अक्षयवट उद्ध्वस्त करून तेथे किल्ला उभारणारा हिंदूद्वेषी अकबर अन् अकबरपुत्र जहांगीर !

सतराव्या शतकाच्या आरंभी मोगल बादशहा अकबराने प्रयागक्षेत्री यमुनेच्या काठावर संरक्षणासाठी किल्ला बांधण्याचे कारण सांगून अक्षयवट आणि त्या परिसरातील मंदिरे यांचा विध्वंस केला. जेथे अक्षयवट होता, तेथे त्याने किल्ल्यातील ‘रानीमहल’ बांधला. काही कालावधीनंतर त्या किल्ल्यात पुन्हा अक्षयवट उगवला. तेव्हा अकबरपुत्र जहांगिराने अनेक वेळा तो जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जहांगिराने उष्ण तवा ठेवून तो वृक्ष मुळापासून नष्ट करण्याचाही प्रयत्न केला; मात्र प्रत्येक वेळी या अक्षयवटाला नवे धुमारे फुटले आणि पुढे त्यांने वृक्षाचे रूप धारण केले. वर्ष १६९३ मधील ‘खुलासत उत्वारीख’ या ग्रंथात ‘जहांगिराने अक्षयवट कापूनही तो पुन्हा उगवला’, अशी साक्ष आहे.

आजही यमुना नदीच्या काठावरील अकबराच्या या किल्ल्यात हा प्राचीन वृक्ष उभा आहे. हिंदूंना मोक्षमिळू नये, यासाठी मोगल बादशहांनी त्याचे दर्शन घेण्यास बंदी घातली. पुढे इंग्रजांनी ती बंदी चालूच ठेवली आणि आजही स्वतंत्र भारतात हिंदूंना तेथील किल्ल्यात जाऊन अक्षयवटाचे दर्शन घेण्यास बंदी आहे. या अक्षयवटाचे दर्शन घेण्याची इच्छा असणार्‍या भाविकांना किल्ल्यातील वृक्षाचे खोड दुरूनच दाखवले जाते. आता ‘प्रयागक्षेत्री किल्ल्यात जाऊन अक्षयवटाचे दर्शन नेहमीच घेता यावे’, यासाठी सर्व हिंदुत्वनिष्ठांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !

 

५. प्रयागचे भाविकांच्या दृष्टीने महत्त्व

५ अ. पापक्षालन : प्रयागमधील तीर्थ भक्तीभावाने प्राशन केल्यास पापांचे क्षालन होते.

५ आ. स्वर्गप्राप्ती : प्रयाग येथे स्नान आणि दानधर्म करणार्‍यांना स्वर्गप्राप्ती होते.

 

६. महाकुंभमेळा

येथील त्रिवेणी संगमावर प्रत्येक १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. या कुंभपर्वात मकरसंक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे असतात. माघी पौर्णिमा या दिवशी पर्वकाळ मानला जातो. या चारही पर्वांच्या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असते. या दिवशी प्रयागतीर्थात स्नान केल्याने १ सहस्त्र अश्वमेध, १०० वाजपेय आणि पृथ्वीभोवती १ लक्ष प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळते.

 

प्रयाग येथील त्रिवेणी संगमाची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

आ. सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील चांगली स्पंदने : ३ टक्के’ – प.पू. डॉ. आठवले

इ. `सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : गंगातत्त्व २.२ टक्के, यमुनातत्त्व २.२ टक्के, चैतन्य ३ टक्के आणि शक्ती २.५ टक्के.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कुंभमेळ्याचे महत्त्व आणि पावित्र्यरक्षण’

Leave a Comment