पाण्याच्या भौतिक शुद्धतेच्या जोडीला ते आध्यात्मिक दृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !

‘वर्ष २०३० पर्यंत सर्वांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे’, हे ‘संयुक्त राष्ट्रां’चे ध्येय आहे. या अनुषंगाने २२ मार्च २०१९ या ‘जागतिक जल दिना’चे ब्रीदवाक्य आहे – ‘तुम्ही कुणीही असा, कुठेही असा – ‘पिण्याच्या पाण्याची उपलब्धता’ हा तुमचा मूलभूत मानवाधिकार आहे.’ प्रत्यक्षात जगातील जलाशयांपैकी केवळ २.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. त्यातही बहुतांश पिण्यायोग्य पाणी हिमनग, पर्वतांवरील बर्फ आणि भूमीखाली असलेले आहे. त्यामुळे एकूण पिण्यायोग्य पाण्याच्या केवळ ०.०१ टक्का पाणी सरोवर आणि नद्या यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. या ०.०१ टक्के पाण्यावर ७४० कोटी मानव,वनस्पती आणि प्राणी अवलंबून आहेत. यावरून पिण्याचे पाणी हा पृथ्वीवरील किती दुर्मिळ आणि अमूल्य घटक आहे, हे आपल्या लक्षात येते. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शुद्धता यांच्यासंदर्भात जगभर पुष्कळ अभ्यास झाला आहे अन् चालू आहे; मात्र हा अभ्यास पाण्याची स्थूल भौतिक शुद्धता आणि वितरण यांवरच केंद्रित झालेला आढळतो. केवळ या निकषांवर केलेला मर्यादित अभ्यास मानवाच्या सर्वांगिण हिताच्या दृष्टीने उपयुक्त आहे का ?

 

१. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने
जगभरातील जलस्त्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा केलेला अभ्यास

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण (टीप) यांच्या आधारे जगभरातील जलस्रोतांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला. या आध्यात्मिक संशोधनाचा आरंभ फेब्रुवारी २०१८ मध्ये झाला.

टीप – सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटकासंबंधी पंचज्ञानेंद्रिये (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील जाणणे म्हणजे सूक्ष्मातील जाणणे किंवा सूक्ष्म परीक्षण करणे होय.

 

२. वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासाचा उद्देश

‘जगभरातील जलस्त्रोतांतून मिळवलेल्या पाण्याच्या नमुन्यांचा आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या साहाय्याने अभ्यास करून पाण्याच्या नमुन्यांची प्रदेश आणि जलस्त्रोताचा प्रकार यांच्या स्तरांवरील आध्यात्मिक वैशिष्ट्ये जाणणे’, हे ध्येय या संशोधनामध्ये ठेवण्यात आले होते.

 

३. जगभरातून पाण्याचे नमुने जमवण्याची पद्धत

अ. सनातन संस्था आणि स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) या आध्यात्मिक संस्थांचे जगभरातील साधक आणि हितचिंतक यांना त्यांच्या परिसरातील पाण्याचे नमुने सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.

आ. संशोधनासाठी जगभरातील अधिकाधिक जलस्त्रोतांमधून नमुने मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१९ या कालावधीत २६ देशांतील एकूण २६१ पाण्याचे नमुने मिळाले.

इ. या नमुन्यांतील अंगभूत सूक्ष्म स्पंदनांवर अन्य स्पंदनांचा प्रभाव पडू नये, यासाठी ‘नमुने मिळवणे’ ते ‘त्यांचा उपकरणाच्या माध्यमातून अभ्यास करणे’ यांमधील कालावधी २ – ३ दिवसांच्या वर जाऊ नये, याची काळजी घेण्यात आली.

 

४. युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरच्या (यू.ए.एस्.च्या) माध्यमातून केलेला अभ्यास

४ अ. ‘यू.ए.एस्.’च्या माध्यमातून घटकाची सूक्ष्म ऊर्जा आणि एकूण प्रभावळ मोजता येणे

पाण्याच्या अभ्यासासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या वैज्ञानिक उपकरणाचा उपयोग करण्यात आला. भूतपूर्व अणुवैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून एखादी वस्तू, वास्तू, वनस्पती, प्राणी किंवा मनुष्य यांतील सूक्ष्म सकारात्मक ऊर्जेची आणि नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ, तसेच त्याची एकूण प्रभावळ मोजता येते. नकारात्मक ऊर्जा दोन प्रकारची असते. त्यांपैकी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा त्या घटकाच्या भोवतीची नकारात्मक ऊर्जा असते, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा त्या घटकामधील नकारात्मक स्पंदने दर्शवते.

४ आ. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्.’या
उपकरणाच्या माध्यमातून २ सहस्रपेक्षा अधिक घटकांच्या मोजण्यांच्या नोंदी केलेल्या असणे

गेल्या ५ वर्षांत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्यावतीने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या माध्यमातून व्यापक संशोधन करण्यात आले आहे. यामध्ये सजीव आणि निर्जीव घटकांच्या २ सहस्रपेक्षा अधिक घटकांच्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

४ इ. ‘घटकांचे केलेले सूक्ष्म परीक्षण आणि ‘यू.ए.एस्.’ च्या
माध्यमातून केलेले परीक्षण तंतोतंत जुळते’, असा आमचा अनुभव आहे.

४ ई. फेब्रुवारी २०१८ ते २०मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत एकूण
२६ देशांतील २६१ पाण्याच्या नमुन्यांचा ‘यू.ए.एस्.’द्वारे अभ्यास करण्यात आला आहे.

 

५. पाण्याच्या आध्यात्मिक स्तरावरील अभ्यासासाठी निवडलेल्या
जलस्त्रोतांचे प्रकार आणि प्रत्येक प्रकारातील पाण्याच्या नमुन्यांची संख्या

जलस्त्रोताचा प्रकार पाण्याच्या नमुन्यांची संख्या
१. पवित्र जल (टीप १) १०
२. नळाचे पाणी १३०
३. कालवे
४. झरे आणि धबधबे
५. नैसर्गिक आणि मानवनिर्मित तलाव २०
६. सरोवर
७. नद्या (टीप २) ५९
८. समुद्र २५
एकूण नमुने २१६

 

टीप १ – ‘पवित्र जल’ म्हणजे प्रार्थना घरे, भारतातील तीर्थक्षेत्रे, तसेच विदेशातील पवित्र समजली जाणारी ठिकाणे येथील ‘पवित्र जल’ म्हणून ओळखले जाणारे पाणी.

टीप २ – काही नद्यांमधून नदीच्या पात्रातील वेगवेगळ्या भागांमधून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते.

 

६. पाण्याच्या नमुन्यांमध्ये आध्यात्मिक
स्तरावर आढळलेली सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने

६ अ. जगभरातील (भारतासह) पाण्याच्या नमुन्यांचे केलेले विश्‍लेषण

स्पंदनांचे प्रकार स्पंदनांनुसार पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण (टक्के)
१. सकारात्मक ३६
२. नकारात्मक ५९
३. दोन्ही स्पंदने (टीप)
४. कोणतीही स्पंदने न आढळणे
एकूण नमुने (टक्के) १००

 

टीप – ‘दोन्ही स्पंदने’ म्हणजे पाण्याच्या नमुन्या मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक, अशी दोन्ही प्रकारची स्पंदने आढळणे.

६ आ. भारताव्यतिरिक्त जगभरातील पाण्याच्या नमुन्यांचे केलेले विश्‍लेषण

स्पंदनांचे प्रकार स्पंदनांनुसार पाण्याच्या नमुन्यांचे प्रमाण (टक्के)
१. सकारात्मक १३
२. नकारात्मक ८४
३. दोन्ही स्पंदने
४. कोणतीही स्पंदने न आढळणे
एकूण नमुने (टक्के) १००

सूत्र क्र. ‘६ अ’ आणि ‘६ आ’ मधील सारण्यांतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. भारताबाहेरील पाण्याच्या नमुन्यांपैकी ८४ टक्के नमुन्यांमध्ये नकारात्मक स्पंदने आढळली. याउलट जेव्हा जगभरातील पाण्याच्या नमुन्यांमध्ये भारतातील नमुन्यांचा सहभाग होता, तेव्हा नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ५९ टक्के, म्हणजे अल्प होते. याचे कारण ‘भारतातील पाण्याच्या ११९ नमुन्यांपैकी केवळ २९ टक्के नमुन्यांमध्ये नकारात्मक स्पंदने आढळली’, हे आहे.

२. भारताबाहेरील पाण्याच्या नमुन्यांपैकी ३७ टक्के नमुन्यांमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली, तर भारतातील पाण्याच्या नमुन्यांपैकी केवळ १३ टक्के नमुन्यांमध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली.

 

७. पाण्याच्या नमुन्यांमधील सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदनांचे देशपरत्वे विश्‍लेषण

देश पाण्याच्या एकूण नमुन्यांची संख्या स्पंदनांनुसार पाण्याच्या नमुन्यांची संख्या नकारात्मक स्पंदने असलेल्या नमुन्यांचे प्रमाण (टक्के) सकारात्मक स्पंदने असलेल्या नमुन्यांचे प्रमाण (टक्के)
नकारात्मक स्पंदने असणे सकारात्मक स्पंदने असणे दोन्ही स्पंदने असणे कोणतीही स्पंदने न आढळणे
१. बोलिव्हिया १००
२. कोलंबिया १००
३. इजिप्त १००
४. एल् साल्वादोर १००
५. ग्रीस १००
६. मलेशिया १००
७. माल्टा १००
८. पोलंड १००
९. सौदी अरेबिया १००
१०. ऑस्ट्रेलिया १००
११. सर्बिया ६७ ३३
१२. संयुक्त अरब अमिराती ७५ २५
१३. स्वित्झर्लंड ८० २०
१४. कॅनडा १००
१५. क्रोएशिया ८३ १७
१६. सिंगापूर १००
१७. रशिया १००
१८. लेबनन १००
१९. अमेरिका १० ९० १०
२०. ऑस्ट्रिया ११ ११ १००
२१. इंडोनेशिया ११ ४५ ३६ (टीप)
२२. फ्रान्स १२ ११ ९२
२३. युनायटेड किंग्डम १२ ११ ९२
२४. श्रीलंका १२ ५० ४२  (टीप)
२५. जर्मनी १४ १० ७१ २१  (टीप)
२६. भारत ११९ ३५ ७६ २९ ६४ (टीप)

टीप – वरील सारणीत ज्या देशांतून मिळालेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये केवळ सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने न आढळता दोन्ही स्पंदने आढळली किंवा कोणतीही स्पंदने आढळली नाहीत, तिथे शेवटच्या दोन रकान्यांमधील स्पंदनांची बेरीज १०० टक्के येत नाही, हे लक्षात घ्यावे.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

अ. पाण्याच्या एकूण नमुन्यांपैकी सकारात्मक स्पंदने असलेल्या नमुन्यांचे सर्वाधिक प्रमाण (६४ टक्के) भारतातील होते.

आ. एकूण २६ देशांपैकी केवळ ११ देशांमधील जलस्त्रोतांमध्ये सकारात्मक स्पंदने आढळली.

इ. एकूण २६ देशांपैकी २० देशांमधील पाण्याच्या बहुतांश (७० टक्क्यांहून अधिक) नमुन्यांमध्ये नकरात्मक स्पंदने आढळली.

 

८. नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीनुसार (उतरत्या क्रमाने) क्रमवारीत असलेले पाण्याचे १० नमुने

पाण्याच्या नमुन्याचे ठिकाण नमुन्याचा प्रकार नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर) ‘अल्ट्राव्हायोलेट’ नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर) सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
१. मँचेस्टर विमानतळ, मँचेस्टर, युनायटेड किंग्डम नळाचे पाणी ५.७५ ३.७९
२. ब्रिजवॉटर कॅनॉल, टिंपर्ली, मँचेस्टर, युनायटेड किंग्डम कालवा ४.९३ ३.६२
३. बाटलीबंद पिण्याचे पाणी (स्थानिक उत्पादन), एथन्स, ग्रीस ३.८० १.८४
४. बाटलीबंद पिण्याचे पाणी (स्थानिक उत्पादन), केटोविच, पोलंड ३.६७ २.१८  

५. एफॉन बॅन्वी नदी, वेल्शपूल, युनायटेड किंग्डम नदी ३.५६ २.६९
६. वीर्न्वी नदी, वेल्शपूल, युनायटेड किंग्डम नदी ३.४९ २.१३
७. प्रार्थनाघरातील पवित्र जल, सॅन फ्रॅन्सिस्को, अमेरिका पवित्र जल ३.३० १.७८
८. बाटलीबंद पिण्याचे पाणी (प्रख्यात उत्पादन), फोंडा, गोवा ३.२२ २.१८
९. बाटलीबंद पिण्याचे पाणी (स्थानिक उत्पादन), फोंडा, गोवा ३.०३ १.९६
१०. गॅले फेस बीच समुद्राचे पाणी, कोलंबो, श्रीलंका समुद्र ३.०० १.२७

सर्वाधिक नकारात्मकता असलेल्या वरील १० नमुन्यांपैकी ४ नमुने बाटलीबंद पाण्याचे आहेत. सर्वसामान्य लोक प्रवासामध्ये बाटलीबंद पाणी पिणे सुरक्षित समजतात; पण प्रत्यक्षात त्यामध्येच पुष्कळ नकारात्मक स्पंदने असल्याचे लक्षात येते. यावरून ‘ते पाणी स्थूल स्तरावरील शुद्धतेची हमी देत असले, तरीही ते आध्यात्मिक स्तरावरील शुद्धतेची हमी देत नाही’, हे लक्षात येते.

८ अ. जगभरातील बहुतांश जलस्त्रोतांमध्ये नकारात्मक स्पंदनेच असणे, हे धोकादायक लक्षण असणे

जगभरातील वेगवेगळ्या जलस्त्रोतांच्या पाण्यामध्ये अधिकतर नकारात्मक स्पंदने आढळली. यावरून ‘जगभरातील पाणी नकारात्मक स्पंदनांनी भारित झाले आहे’, हे लक्षात येते. ‘जगभर तमोगुण वाढला आहे’, असे अनेक संत जे सातत्याने सांगत आहेत. त्याची सत्यता यावरून पटते. या तमोगुणाच्या वाढीचे पर्यवसान अंतिमतः तिसरे महायुद्ध आणि तीव्र नैसर्गिक आपत्तीयांमध्ये होईल. त्यामुळे हे लक्षण सर्वांसाठी धोकादायक आहे !

 

९. सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीनुसार (उतरत्या क्रमाने) क्रमवारीत असलेले पाण्याचे १० नमुने

पाण्याच्या नमुन्याचे ठिकाण नमुन्याचा प्रकार ‘इन्फ्रारेड’ नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर) ‘अल्ट्राव्हायोलेट’ नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर) सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत प्रतिदिन ठेवले जात असलेले उकळलेले पिण्याचे पाणी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा नळाचे पाणी  ० १५.६९
२. ध्यानमंदिरातील तीर्थ, सनातनचा आश्रम, रामनाथी, गोवा नळाचे पाणी  ० १४.०२
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील हस्त प्रक्षालन पात्रातील (वॉश बेसिनमधील) पाणी, रामनाथी, गोवा नळाचे पाणी  ८.३७
४. वॉटर फिल्टरचे पाणी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा नळाचे पाणी ८.३७
५. सरस्वती कुंडातील पाणी, प्रयाग, उत्तर प्रदेश नदी ६.५२
६. तुंग नदीचे पाणी, कर्नाटक नदी ४.९५
७. प्रयागमधील त्रिवेणी संगमापासून ५०० मीटर अंतरावरचे पाणी पवित्र पाणी ४.०६
८. श्री वडक्कुनाथन् मंदिर, केरळ पवित्र पाणी  ० ३.८०
९. त्रिवेणी संगमाच्या जवळील गंगेच्या पात्रातील पाणी, प्रयाग, उत्तर प्रदेश पवित्र पाणी ३.६३
१०. कुंभमेळ्यातील राजयोगी स्नानाच्या दिवशी (४.२.२०१९) त्रिवेणी संगमातील पाणी, प्रयाग, उत्तर प्रदेश पवित्र पाणी ३.५५

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवलेल्या उकळून थंड केलेल्या पाण्यामध्ये, तसेच त्यांच्या खोलीतील हस्त प्रक्षालनपात्रातील (वॉश बेसिनमधील) पाण्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या उच्च पातळीच्या संतांचा त्यांच्या सान्निध्यातील पाण्यावर सकारात्मक परिणाम होतो’, हे लक्षात येते.

२. जगभरातील सर्वाधिक सकारात्मक स्पंदने असलेल्या पाण्याच्या नमुन्यांमधील पहिले ४ नमुने सनातनच्या आश्रमातील आहेत. सनातनच्या आश्रमात संत आणि साधक वास्तव्य करत असून ते प्रतिदिन साधना करतात. यावरून ‘संत आणि साधक यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचा, तसेच त्यांच्या साधनेचा त्यांच्या सान्निध्यातील पाण्यावर कसा सकारात्मक परिणाम होतो’, हेही लक्षात येते.

३. व्यक्तींमधील नकारात्मक ऊर्जेचा त्यांच्या संपर्कातील पाण्यावर नकारात्मक परिणाम होतो, हे सर्वश्रुत आहे. हे कृत्रिम तलावांमधील (स्विमिंग पूलमधील) पाण्यातील नकारात्मक ऊर्जेवरून (‘इन्फ्रारेड’ नकारात्मक ऊर्जा २.७६ मीटर आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ नकारात्मक ऊर्जा १.३४ मीटर) लक्षात येते. याउलट भारतातील कुंभमेळ्यामध्ये राजयोगी स्नानाच्या दिवशी लाखो व्यक्ती प्रयागमधील संगमात आंघोळ करत असूनही तेथील पाण्यात त्या दिवशी सकारात्मक ऊर्जा वाढलेली आढळली. (कुंभमेळ्यामध्ये राजयोगी स्नानाच्या आदल्यादिवशी प्रयागमधील संगमातील पाण्याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १.७५ मीटर होती, तर प्रयागमधील संगमामध्ये लाखो लोकांनी स्नान करूनही तेथील पाण्याच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३.५५ मीटर आली.) त्यादिवशी साधू-संत करत असलेल्या स्नानामुळे सकारात्मक ऊर्जा वाढली.

 

१०. सारांश – पाणी भौतिकदृष्ट्या शुद्ध
असण्याबरोबर ते आध्यात्मिकदृष्ट्याही शुद्ध असणे आवश्यक !

जगभरातील २६ देशांतील पाण्याच्या २१६ नमुन्यांपैकी बहुतांश नमुन्यांमध्ये नकारात्मकता आढळणे, हे चिंताजनक आहे. असे हे आध्यात्मिकदृष्ट्या अशुद्ध पाणी प्राशन केल्याने किंवा त्याने आंघोळ केल्याने मनुष्यावर आध्यात्मिकदृष्ट्या अनिष्ट परिणाम होतात. हे परिणाम शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील विविध व्याधींच्या रूपात दिसून येतात. त्यामुळे ‘सर्वांसाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता’, यासाठीच्या व्यापक प्रयत्नांत पाण्याच्या आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धतेसाठीही प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत समाजात अधर्म माजला आहे; कारण समाजात साधना करणार्‍यांचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामस्वरूप व्यक्तींमधील रज-तमाचा परिणाम वातावरण, तसेच पाणी यांवर झाला आहे. धर्माचरण आणि नियमित साधना केल्याने माणसातील रज-तम न्यून होत जातो आणि त्याच्यामध्ये सात्त्विकता निर्माण होते. या सात्त्विकतेचा सुपरिणाम वातावरण, पाणी, भूमी इत्यादींवर होतो. त्यामुळे सर्वांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी समाजात साधनेचा व्यापक प्रसार होणे आवश्यक आहे !’

संदर्भ : महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

Leave a Comment