हिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई लढावी ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. रमेश शिंदे

मुंबई – ‘अक्षय्य तृतीया’ हा हिंदु सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते; मात्र या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड’ने अक्षय्य तृतीयेच्या नावाखाली जणू ‘रमझान’चेच विज्ञापन करत असल्याप्रमाणे अभिनेत्री करीना कपूर खान हिचे कपाळावर कुंकू किंवा टिकली न लावता दागिन्यांचे विज्ञापन केले. यातून हेतूतः हिंदु समाजाच्या भावना दुखावण्याचा, हिंदु संस्कृतीचे हनन करण्याचा प्रयत्न केला. हिंदु सणांच्या वेळीही जर हिंदूंच्या धार्मिक भावनांचा, संस्कृतीचा, परंपरांचा सन्मान ठेवला जात नसेल, तर हिंदूंनीही या उत्पादनांवर बहिष्कार घालायला हवा. याला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘#No_Bindi_No_Business’ हा ‘हॅशटॅग’द्वारे (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) ट्विटरवर अभियान राबवले आणि याला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दुसऱ्याच दिवशी ‘मलबार गोल्ड’ने टिकली न लावलेल्या करीना कपूर खान यांच्या जागी टिकली लावलेले तमन्ना भाटिया या अभिनेत्रीचे नवीन विज्ञापन प्रसारित केले. हा हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचा परिणाम आहे. हिंदूंचा पैसा पाहीजे; पण हिंदु संस्कृती-परंपरा नको, हे चालणार नाही. हिंदुस्थानात व्यापार करायचा असेल, तर हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवायलाच लागेल. जर तो राखला जाणार नसेल, तर हिंदु समाज बहिष्कारास्त्राचा वापर करील, हे आस्थापनांनी लक्षात ठेवावे, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली. समितीच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी ‘हिंदु सणांच्या वेळी हिंदुविरोधी प्रचार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित केला होता. त्या वेळी श्री. शिंदे यांनी वरील चेतावणी दिली.

‘मलबार गोल्ड’कडून करीना कपूर खान यांच्याऐवजी तमन्ना भाटिया यांचे छायाचित्र असणारे नवीन विज्ञापन प्रसारित !

 

हिंदुविरोधी विचारधारेला अभ्यासपूर्ण विरोध केला पाहिजे !
– अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे

अधिवक्ता सतीश देशपांडे

काँग्रेसच्या राजवटीत डाव्या विचारसरणीच्या लोकांना राजाश्रय मिळाल्यामुळे त्यांनी विविध विद्यापिठे स्थापून हिंदुविरोधी विचारधारा समाजात रूजवली आहे. त्याचाच परिणाम आहे की, आज टिकली वा कुंकू न लावलेले विज्ञापन प्रसारित होत आहे. त्याला अभ्यासपूर्ण विरोध केला पाहिजे.

 

हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू केलेला
हा ‘सांस्कृतिक जिहाद’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार

हिंदूंची ओळख पुसण्यासाठी चालू करण्यात आलेला हा ‘सांस्कृतिक जिहाद’ आहे. आज आखाती देशांमध्ये तेथील महिला पत्रकार हिजाब घालून बातमीपत्र देतात. मग भारतात आपण कपाळावर कुंकू लावले, तर प्रतिगामी कसे होऊ शकतो ? हिंदु धार्मिक कृतींमागील विज्ञान हिंदूंपर्यंत पोचले पाहिजे.

हिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह
कायदेशीर लढाई लढावी ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था श्री. अभय वर्तक

श्री. अभय वर्तक

केवळ ‘मलाबार’ वालेच नव्हे, तर यापूर्वीही तनिष्क, फॅब इंडिया, मिंत्रा, जावेद हबीब, मान्यवर ब्रँड आदींनी हिंदुविरोधी आक्षेपार्ह विज्ञापने केली आहेत. एकही विज्ञापन मुसलमान वा अन्य पंथीय यांच्या विरोधात नाही; कारण ते धर्मासाठी संघटित आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात विज्ञापन करण्याचे कुणी धाडस करत नाही. हिंदूंनी स्वत:चा धर्म जपण्यासाठी अशा उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह कायदेशीर लढाई लढली पाहिजे. याविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली पाहिजे.

 

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने कपाळावर
कुंकू लावण्याच्या संदर्भात केलेले वैज्ञानिक संशोधन !

स्त्रियांनी कुंकू लावणे, हे त्यांच्यासाठी पुष्कळ लाभदायी असणे !

सौ. मधुरा कर्वे

स्त्रियांनी कुंकू लावणे, हे त्यांच्यासाठी पुष्कळ लाभदायी आहे. या संशोधनात आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि नसलेल्या स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. कपाळावर कुंकू लावण्यापूर्वी आणि ते लावल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाने संशोधन करण्यात आले. कुंकू लावल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या स्त्रियांमधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. आध्यात्मिक त्रास नसलेल्या स्त्रियांमध्ये अल्प प्रमाणात असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

Leave a Comment