रशियात होलिका दहनासारखा साजरा केला जाणारा मास्लेनित्सा फेस्टिव्हल

नुकतेच १४ मार्च २०२१ या दिवशी रशियात १०२ वर्षे जुना मास्लेनित्सा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला. या फेस्टिव्हलमध्ये लोकांनी ७८ फूट उंच लाकडी घराला जाळले आणि मिठाईचे वाटप करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या पारंपरिक सणाला वसंतऋतूचे आगमन, कुटुंबाशी जवळीक आणि असत्याच्या विजयाच्या प्रतिकाच्या स्वरूपात साजरे करण्यात येते. भारतातील होलिका दहनासारखेच रशियातील या सणाचे स्वरूप आहे.

 

रशियातील होलिकोत्सवाचे स्वरूप

या सणाच्या कालावधीत लोक कुटुंबासमवेत वेळ घालवतात, पूर्वजांचे स्मरण करतात आणि जत्रेचा आनंद घेतात. तसेच जुन्या वस्तूही जाळल्या जातात, याला नवा प्रारंभ आणि पापांपासून मुक्तीचे प्रतिक मानण्यात येते. यंदाच्या वर्षीची संकल्पना ‘फेयरवेल ऑफ कोरोना’ होती. ही संकल्पना अनिष्ट शक्तींना जाळून संपवण्याची आणि वाटचाल करण्याची होती. या वेळी लोकांनी लाकडी महालाला मास्कने सजवले आणि एक व्हॅक्सिनेशन टॉवरही सिद्ध केला.

 

होलिका दहनासारखे साम्य दर्शवणारे विदेशातील उत्सव

जगातील ५० हून अधिक देशांमध्ये भारताच्या होलिका दहनासारखे सण साजरे करण्यात येत असतात. यात ब्रिटनचा बोन फायर फेस्टिव्हल, स्पेनचा मर्क, अमेरिकेचा बर्निंग मॅन, जपानचा वाकाकुसा यामायाकी किंवा माऊंटेन बर्निंग फेस्टिव्हल आणि ग्वाटेमालाचा राक्षसांच्या अंताचा प्रतिक क्वेमा डेल डियाब्लो यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

(संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’, १६.३.२०२१)

Leave a Comment