Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

होळीतील ‘बोंब मारणे’ या कृतीमागील शास्त्र

हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते. बोंब मारण्यामागील नेमके शास्त्र, त्यापासून होणारा लाभ आणि विकृती केल्यास होणारी हानी यांविषयीचे विवेचन या लेखातून केले आहे.

बोंब मारतांना (योग्य पद्धत)
बोंब मारतांना (योग्य पद्धत)

 

१. बोंब मारणे

अ. `मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे.

आ. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एकप्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा. काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण, चिखल यांसारखे पदार्थ अंगाला माखून नृत्यगायन करण्याची प्रथा आहे.’

इ. हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. (उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला ‘हुताश्‍न’ असे म्हणतात, उदा. गोल फिरणार्‍या झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्‍या वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला ‘सूक्ष्म हुताश्‍न’ म्हणतात. सूक्ष्म हुताश्‍न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो.’

– ब्रह्मतत्त्व, १८.५.२००६, सकाळी ७.५८

 

२. ‘बोंब मारणे’ या कृतीचे केलेले सूक्ष्म-परीक्षण


अ. ‘व्यक्‍तीच्या मनात सातत्याने चालू असणार्‍या विचारांमुळे तिच्या मनावर आवरण येते.

आ. तिची बुद्धी सातत्याने अनेक विचारांना चालना देत असते.

इ. व्यक्‍तीच्या डोक्यात अनेक विचार कार्यरत रूपात असतात.

ई. होळी प्रज्वलित झाल्यावर तोंडावर हात उलटा ठेवून बोंब मारण्याच्या मुद्रेतून शक्‍तीस्वरूप जटील बंध सिद्ध होऊन व्यक्‍तीच्या हाताभोवती शक्‍ती लालसर रंगात गोलाकार वलयाच्या रूपात फिरू लागते.

उ. हाताच्या मुद्रेतील हालचाल व्यक्‍तीचे मन आणि बुद्धी यांतील विचारांना बाहेर पडण्यास गती प्राप्त करून देते. काही विचार काळसर वलयांच्या माध्यमातून बाहेर पडतात. बोंब मारण्याच्या कृतीमागील हेतू शुद्ध असल्याने काही विचारांचे देहातच विघटन होते.

ऊ. त्याचबरोबर तोंडातून केलेल्या ध्वनीमुळे नादस्वरूप ध्वनीलहरी बाहेर पडून त्या वातावरणात सर्वत्र पसरतात.

ए. व्यक्‍तीचे मन आणि बुद्धी यांतून बाहेर पडणारे विचार अतिसूक्ष्म असल्याने या कृतीतून वातावरणात आकाशतत्त्वात्मक काळे कण पसरतात आणि त्यांचे विघटन होते.

ऐ. त्याचबरोबर व्यक्‍तीच्या मनोदेहावरील काळे आवरण या कृतीतून दूर होते.

ओ. होळी प्रज्वलित असतांना होळीत ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट होत असते.

औ. त्यामुळे होळीमध्ये निर्गुण तत्त्वाचे स्थिर वलय, तसेच चैतन्य, तेजतत्त्व आणि शक्‍ती यांची कार्यरत वलये निर्माण होतात.

अं. होळीतून व्यक्‍तीकडे चैतन्याचा प्रवाह प्रक्षेपित होतो. त्यामुळे व्यक्‍तीला चैतन्य प्राप्त होते.

क. होळीतून व्यक्‍तीकडे शक्‍तीच्या लहरी प्रक्षेपित होतात.

ख. त्याचबरोबर वातावरणात मारक शक्‍तीचे कण पसरतात. बोंब मारण्याची कृती तमप्रधान असूनसुद्धा व्यक्‍तीवर होळीतून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वप्रधान लहरींमुळे वाईट शक्‍तींचे आक्रमण होत नाही.

ग. या कृतीतून व्यक्‍तीच्या देहावरील आवरण दूर होते; मात्र ही कृती अत्यल्प केल्यासच तिचा योग्य तो लाभ होतो. कृतीचा अतिरेक झाल्यास व्यक्‍तीवर तिचे दुष्परिणाम होऊ शकतात.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

३. ‘बोंब मारणे’ या कृतीच्या विकृतीकरणाचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

बोंब मारतांना (अयोग्य पद्धत)
बोंब मारतांना (अयोग्य पद्धत)

 

 

अ. ‘बोंब मारण्याच्या कृतीचे विकृतीकरण करणार्‍या व्यक्‍तीमध्ये तीव्र अहंकार असतो.

आ. त्यामुळे तिच्या मनाभोवती तमोगुणी काटेरी वलय कार्यरत होते.

इ. तसेच या वलयातून व्यक्‍तीच्या देहात तमोगुणी कणांचे प्रक्षेपण होते.

ई. व्यक्‍तीच्या देहाभोवती दाट काळे आवरण सिद्ध होते.

उ. व्यक्‍ती साधना करू शकत नसल्याने तिची बुद्धी तमोगुणी होते आणि त्या ठिकाणी काळसर वलय कार्यरत होते.

ऊ. त्यामुळे वातावरणातून वाईट शक्‍ती व्यक्‍तीच्या डोक्यात विचार घालत रहातात.

ए. व्यक्‍तीची जशी वृत्ती, तशी कृती होते आणि तसेच विचार तिच्या मनात येतात. विकृत बोंब मारण्याच्या कृतीमधून व्यक्‍तीच्या मनातून मुखाकडे काळ्या शक्‍तीचा प्रवाह प्रक्षेपित होतो.

ऐ. बोंब मारण्याची कृती करतांना अतिरिक्‍त नाद करणे, शिव्या देणे यांतून तमोगुणी काळ्या वलयांची निर्मिती होते आणि त्याचे वातावरणात प्रक्षेपण होते.

ओ. त्यामुळे वातावरणात काळसर भोवर्‍याप्रमाणे कार्यरत लहरी निर्माण होऊन वातावरण दूषित होते.

औ. वातावरणात दीर्घकाळ तमोगुणी कणांचे अस्तित्व रहाते.

अं. इतरांना चिडवण्यासाठी केलेल्या या कृतीतून व्यक्‍ती मायावी स्वरूपाचा आसुरी आनंद अनुभवते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’