थिरूवनंतपुरम् येथील प्रसिद्ध ‘म्युझिओलॉजिस्ट’ (वस्तूसंग्रहालय तज्ञ) श्री. सतीश सदाशिवन् यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. सतीश सदाशिवन् यांना आश्रमातील ध्यानमंदिर दाखवतांना श्री. अमोल हंबर्डे (उजवीकडे)

रामनाथी (गोवा) – थिरूवनंतपुरम् (केरळ) येथील प्रसिद्ध ‘म्युझिओलॉजिस्ट’ (वस्तूसंग्रहालय तज्ञ) श्री. सतीश सदाशिवन् यांनी १३ ऑक्टोबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. अमोल हंबर्डे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म आणि आध्यात्मिक संशोधन या कार्याविषयी अवगत केले. येथील वास्तव्यात श्री. सदाशिवन् यांनी आश्रमातील ग्रंथ मुखपृष्ठ निर्मिती कक्ष, सनातन प्रभात नियतकालिके, आध्यात्मिक वस्तूंचे संग्रहालय आदींविषयी जाणून घेतले.

सनातन संस्थेनेे संशोधनासाठी संग्रहित केलेल्या वस्तूंचे संग्रहालय जगात एकमेवाद्वितीय ! – सतीश सदाशिवन्

आश्रमात आल्यावर पुष्कळ चांगले वाटले. येथे प्रत्येक गोष्टीकडे संशोधनाच्या दृष्टीने बघण्याचा भाग अतिशय चांगला आहे. ‘हे कार्य लवकर समाजापुढे जायला हवे’, असे वाटते. अध्यात्म आणि संशोधन (विज्ञान) यांची सांगड घालण्याचा तुमचा प्रयत्न आवडला. सर्व संतांचे महत्त्व समजवणार्‍या प्रक्रिया, संतांनी वापरलेल्या वस्तू आणि तीर्थक्षेत्रे येथील वस्तू यांचे प्रदर्शन हे आध्यात्मिक स्तरावरील प्रदर्शन आहे. असे संशोधन आणि त्यासाठी संग्रहित केलेल्या अनेक विविधांगी वस्तू यांचे प्रदर्शन यापूर्वी मी कुठेच पाहिले नाही. त्यामुळे ‘पुढे हे संग्रहालय जगातील एकमेवाद्वितीय (युनिक) होणार’, असे वाटते.

 

श्री. सतीश सदाशिवन् यांचा संक्षिप्त परिचय

श्री. सतीश सदाशिवन् हे भारतातील प्रसिद्ध ‘म्युझिओलॉजिस्ट’ (संग्रहालय तज्ञ) आहेत. बडोदा येथून त्यांनी म्युझिओलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले, तसेच जबलपूर येथून त्यांनी ‘ऑर्कोलॉजी’मध्ये (पुरातत्वशास्त्रामध्ये) एम्.ए. केले. त्यांनी ‘टेक्सीडर्मी’ (प्रदर्शनासाठी मृत प्राण्यांचे शरीर जतन करण्याचे तंत्र) यात विशेष प्रावीण्य मिळवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment