भावनेच्या स्तरावर कोणतीही असंवैधानिक कृती करण्याची सनातनची शिकवण नाही !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. अध्यात्मात कर्मफलसिद्धान्त महत्त्वाचा मानला आहे. कर्माचे फळ अटळ आहे. केलेल्या कर्माचे फळ पाप-पुण्याच्या रूपात भोगावे लागते. भावनिक कृतींमुळे केलेल्या हिंसेचे फळही भोगावे लागते. यासाठी सनातनमध्ये कुठेही भावनिक कृतींना स्थान नाही.

२. हिंदु राष्ट्राची स्थापना ही होणारच आहे; पण ती क्षात्रधर्माच्या नावे केलेल्या भावनिक प्रयत्नांमुळे नाही, तर कालमाहात्म्यानुसार होणार आहे. प्रभु श्रीरामाला १४ वर्षांच्या वनवासानंतर, तर पांडवांना १२ वर्षांचा वनवास आणि १ वर्षाचा अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर राज्य प्राप्त झाले. त्याप्रमाणे कालमहिम्यानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदूंनाही वाईट काळ सरल्यानंतर हिंदु राष्ट्र निश्‍चित मिळणार आहे !

३. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकांच्या दृष्टीने धर्म आणि अधर्म यांच्यातील लढा स्थुलातून नव्हे, तर सूक्ष्मातून जिंकणे महत्त्वाचे असते. सूक्ष्मातील विजय मिळवण्यासाठी प्रथम स्वतःला जिंकणे, म्हणजे काम, क्रोधादी षड्विकारांवर विजय मिळवणे आणि मनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे !

वरील सर्व सूत्रे लक्षात घेऊन भावनिक कृतींपासून दूर रहाण्यासाठी साधकांनी स्वतःच्या साधनेकडे लक्ष केंद्रीत करणे आणि स्वभावदोष निर्मूलन करणे यांना प्राधान्य दिले पाहिजे. ‘भावनिक कृतींद्वारे स्वतःचे कर्मफल वाढणार नाही’, याकडे लक्ष देणे आणि ‘कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्र येणारच आहे’, यावर श्रद्धा ठेवून समष्टी कार्य करणे अपेक्षित आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.