लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा दिल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !

समाजसेवक, देशभक्त, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांना कृतीशील होण्याचे आवाहन !

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे काळाची आवश्यकता !

लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती दिवसेंदिवस प्रबळ होत असून त्यामुळे सामान्य नागरिकाला दैनंदिन जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. भ्रष्टाचारामुळे शासकीय यंत्रणा खिळखिळी झाली आहे. अशा परिस्थितीत कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आला, तरी लोकांना सुराज्य मिळणे अशक्य आहे. अशा दुष्प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी संघटित होऊन वैध मार्गाने लढा देणे आवश्यक आहे. यासाठी राजकीय पक्षांवर अवलंबून न रहाता समाजहितासाठी सतत कार्यरत असलेले समाजसेवक, देशावर आत्यंतिक प्रेम असलेले देशभक्त आणि हिंदु धर्मसंस्कृतीविषयी आस्था असलेले धर्मप्रेमी यांनी एकत्रित येऊन कार्य करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

 

‘सनबर्न फेस्टीवल’ला केलेला विरोध सर्वांसाठीच प्रेरणादायी !

याचे एक चांगले उदाहरण म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये पुणे जिल्ह्यातील केसनंद गावात होणार्‍या ‘सनबर्न फेस्टीवल’ या नीतीहीन कार्यक्रमाच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते,सामाजिक संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्रित येऊन कार्य केले. या आंदोलनाच्या वेळी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या अनधिकृत कृत्यांची माहिती मिळवली. सर्व ग्रामस्थांनी गावात मद्यबंदीचा ठराव संमत केलेला असतांना देश–विदेशांतील लोकांना मद्यपान आणि नाच–गाणी यांसाठी आमंत्रित करण्यास सामाजिक संघटनांनी विरोध केला, तर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सांस्कृतिक आणि धार्मिक हानीविषयी जागृती केली. या संघटित लढ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊन ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या आयोजकांना अंतिम क्षणापर्यंत अनुमतीसाठी प्रयत्न करावे लागले आणि लक्षावधी रुपये दंड भरावा लागला.

या उदाहरणाप्रमाणे सर्वत्र कृती झाल्यास भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. आपण लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी केलेली एक कृती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल !

 

दुष्प्रवृत्तींविरुद्धचा लढा ते रामराज्य !

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा देणे, हा व्यवस्था–परिवर्तनाचा पहिला टप्पा, तर रामराज्याची अनुभूती देणार्‍या ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना हा अंतिम टप्पा ! लोकशाहीने पोसलेल्या शासकीय आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींनी भारताची अवघ्या ७० वर्षांतच जर्जर अवस्था करून टाकली आहे. या दुष्प्रवृत्ती संघटित असल्याने आणि समाज असंघटित असल्याने त्या समाजाच्या तुलनेत प्रबळ ठरतात. म्हणूनच या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा देणे, हा व्यवस्था–परिवर्तनाचा पहिला टप्पा आहे. आपल्या मातृभूमीला पुन्हा वैभवाच्या शिखरावर न्यायचे असेल, तर देशात आदर्श समाजव्यवस्था देऊ शकणारे आणि रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’च आपल्याला आणावे लागणार आहे. हाच व्यवस्था–परिवर्तनाचा अंतिम टप्पा असेल.

 

प्रभावी जनआंदोलनाद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !

येत्या २ – ३ वर्षांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच्या जनआंदोलनासाठी हिंदूंची कृतीशील संघशक्ती निर्माण करणे आवश्यक आहे. वर्ष २०११ मध्ये समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभारले होते. त्यांची मागणी होती की,भ्रष्टाचार्‍यांवर अंकुश ठेवणारा लोकपाल कायदा झाला पाहिजे. सत्ताधीन भ्रष्ट राज्यकर्ते तो करायला सिद्ध (तयार) नव्हते; परंतु श्री. अण्णा हजारे यांनी केलेल्या जनआंदोलनाचा प्रभाव एवढा मोठा होता की, त्याच भ्रष्ट राज्यकर्त्यांना मनाविरुद्ध जाऊन स्वतःवर अंकुश ठेवणारा ‘लोकपाल कायदा’ संमत करावा लागला. प्रस्थापित व्यवस्थेत केवळ प्रभावी जनआंदोलनामुळे हे घडू शकले. त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्र्रासाठी सामाजिक लढ्याद्वारे आपण उभारणार असलेल्या जनआंदोलनामुळे एक दिवस हिंदु राष्ट्राची ‘अ‍ॅलर्जी’ असलेले हेच धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) राज्यकर्ते भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करतील, याची निश्‍चिती बाळगा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment