धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र !

 

संकल्पना

हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदुहित जपले जाणारे राष्ट्र ! धर्म हाच या राष्ट्रात केंद्रबिंदू असेल ! हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे केवळ राजकारण नाही, तर धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती असेल ! राजकारण, अर्थकारण, संरक्षण, विज्ञान इत्यादी सर्वच क्षेत्रांत हे ‘हिंदू राष्ट्र’ आदर्श असेल आणि त्यातील जनतेला रामराज्याची अनुभूतीदेखील येईल ! त्यागी अन् राष्ट्रोद्धाराची भावना बाळगणारा धर्माचरणी समाज, प्रजेच्या रक्षणार्थ अहोरात्र झटणार्‍या सुरक्षायंत्रणा, सत्यान्वेषी न्यायप्रणाली, कार्यक्षम प्रशासन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे धर्मनिष्ठा अन् राष्ट्रनिष्ठा बाळगणारे समाजहितासाठी निःस्पृहपणे राज्य करणारे राज्यकर्ते, ही या हिंदूराष्ट्राची मानचिन्हे असणार आहेत. येत्या दीड-दोन दशकांतच रामराज्याची झलक दाखवणारे हे धर्माधिष्ठित ‘हिंदू राष्ट्र’ स्थापन होईल.

हिंदु राष्ट्र
हिंदु राष्ट्र

आदर्श आणि सर्वदृष्ट्यासंपन्न ‘हिंदू राष्ट्र’ असे असेल !

१. राजकीयदृष्ट्या हिंदू राष्ट्र

१ अ. भावी हिंदू राष्ट्रातील राज्यकर्ते

धर्मपालक, नीतीमान, नि:स्वार्थी, जनतेवर पितृवत प्रेम करणारे, जनतेकडून धर्माचरण करवून घेणारे आणि संतांच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करणारे असतील.

 

१ आ. भावी हिंदू राष्ट्रातील राज्यघटना

लोकशाहीत ‘कायदा’ हा केंद्रबिंदू धरून राज्यव्यवस्थेची रचना केली जाते. हिंदूराष्ट्रात ‘धर्म’ हाच नीतीनियमांचा आणि राज्यकारभाराचा केंद्रबिंदू असेल.

 

१ इ. भावी हिंदू राष्ट्रातील राज्यव्यवस्था

‘कायद्याचे राज्य’ (कोर्ट ऑफ लॉ) असणार नाही, तर ‘न्यायाचे राज्य’ (कोर्ट ऑफ जस्टीस) असेल.

 

१ ई. भावी हिंदू राष्ट्रातील निवडणुका

निवडणुका नसतील. जनता योग्य अन् पात्र नागरिकाला राज्यकारभार करण्यास सांगेल.

 

२. सामाजिकदृष्ट्या हिंदु राष्ट्र

२ अ. भावी हिंदू राष्ट्रातील समाजव्यवस्था

समाजव्यवस्थेत ‘धर्म’ हा केंद्रबिंदू असल्याने समाज नीतीमान आणि सदाचारी बनेल. समाजात जातीव्यवस्था नाही, तर गुण-कर्मावर आधारित व्यवस्था असेल.

 

२ आ. भावी हिंदू राष्ट्रातील समाज

हिंदूराष्ट्रात आयुष्यमर्यादा सर्वसाधारण शंभर वर्षांपर्यंत राहील. सुप्रजननशास्त्राच्या दृष्टीने अनुकूल विवाह होतील. त्यामुळे शक्‍तीशाली आणि दीर्घायुषी प्रजा निर्माण होईल.

 

२ इ. भावी हिंदू राष्ट्रातील लोकसंख्या

इंद्रियसंयम शिकवण्यासाठी ‘एकच मूल (धर्मज संतती) व्हावे’, असे सांगणार्‍या वेदांच्या आज्ञेचे पालन केले जाईल. त्यामुळे देशाची लोकसंख्या नियंत्रणात राहील.

 

२ ई. भावी हिंदू राष्ट्रातील नागरिक

धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. धर्म जगला, तर राष्ट्र जगते. यासाठी राष्ट्रातील नागरिक धर्माचरणी असावेत. हिंदूराष्ट्रामध्ये नागरिक धर्मशिक्षित अन् धर्माचरणी असतील.

 

२ उ. भावी हिंदू राष्ट्रातील स्त्री सन्मान

स्त्रीचे शीलरक्षण, हे परमकर्तव्य असेल. स्त्रिया पतीव्रता असतील.

 

२ ऊ. भावी हिंदू राष्ट्रातील कुटुंबव्यवस्था

एकत्र कुटुंबपद्धती पुनरुज्जीवित केली जाईल. वृद्धाश्रम नसतील.

 

२ ए. भावी हिंदू राष्ट्रातील आहार

सात्त्विक असेल; कारण अशा आहारामुळे शरीर अन् मन शुद्ध होते.

 

३. प्रशासकीयदृष्ट्या हिंदू राष्ट्र

३ अ. भावी हिंदू राष्ट्रातील प्रशासन

हिंदूराष्ट्रात जनतेला आधार वाटणारे पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी असतील. त्यांची नियुक्‍ती करतांना राष्ट्रभक्‍ती अन् धर्मप्रेम या दोन घटकांना सर्वाधिक प्राधान्य असेल.

 

३ आ. भावी हिंदू राष्ट्रातील करव्यवस्था

हिंदूराष्ट्रात जनतेचे आर्थिक शोषण करणारी नाही, तर राष्ट्रीय प्रगतीसाठी आवश्यक तेवढेच कर वसूल करणारी, कौटिल्याच्या अर्थनीतीनुसार करव्यवस्था असेल.

 

३ इ. भावी हिंदू राष्ट्रातील संरक्षणव्यवस्था

बाह्य अन् अंतर्गत शत्रूंचा बीमोड केला जाईल. त्यामुळे प्रजा सुरक्षित जीवन जगेल.

 

३ ई. भावी हिंदू राष्ट्रातील कृषीव्यवस्था

लोकगरजा पूर्ण करणारी आणि राष्ट्रीय प्रगतीला पोषक कृषीव्यवस्था असेल.

 

४. न्यायिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

४ अ. भावी हिंदू राष्ट्रातील कायदे

धर्मांतरबंदी, गोवंशहत्याबंदी आदी हिंदुहिताचे कायदे असतील. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण नसेल, तर सर्व लोकांसाठी ‘समान नागरी कायदा’ असेल.

 

४ आ. भावी हिंदू राष्ट्रातील न्यायदान

न्यायाधीश सूक्ष्मातील जाणणारे असल्याने वकील नसतील आणि योग्य अन् त्वरित न्याय मिळेल.

 

४ इ. भावी हिंदू राष्ट्रातील दंडनीती

चोर, भ्रष्टाचारी आदींना कठोर शिक्षा दिली जाईल. त्यामुळे समाज नीतीमान अन् सदाचारी बनेल.

 

५. भाषिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

५ अ. संस्कृत भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला जाऊन तिचा विकास केला जाईल.

५ आ. स्थानिक कारभार प्रांतीय भाषा व राष्ट्रीय कारभार राष्ट्रभाषा यांत होईल.

५ इ. सर्व हिंदू भाषांतील परकीय शब्द वगळून नागरिकांना शुद्ध भाषा बोलणे अनिवार्य केले जाईल.

 

६. धार्मिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

६ अ. भावी हिंदू राष्ट्रातील देवळे

देवळे अन् तीर्थक्षेत्रे परकीय विध्वंसकांपासून सदाची मुक्‍त होतील. देवळांचे विश्‍वस्त आणि सेवेकरी भक्‍त असतील, तसेच देवनिधीचा वापर धर्मकार्यासाठीच होईल.

 

६ आ. भावी हिंदू राष्ट्रातील अध्यात्मीकरण

हिंदूराष्ट्रात व्यवसाय, वस्तू आदींचे अध्यात्मीकरण केले जाईल, उदा. घरबांधणी, रस्तेबांधणी आदींत सात्त्विकता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न असतील.

 

७. शैक्षणिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

७ अ. हिंदू राष्ट्रातील अध्यात्म विश्‍वविद्यालय

अध्यात्मात प्रगती करू इच्छिणार्‍यांसाठी ‘अध्यात्म विश्‍वविद्यालये’ स्थापण्यात येतील. या विद्यालयांतून बाहेर पडणारे विद्यार्थी संतच असतील.

 

७ आ. भावी हिंदू राष्ट्रातील शिक्षण

हिंदूराष्ट्रात ‘मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत’ रहित करून ‘धर्मनिष्ठ गुरुकुल पद्धत’ पुनरुज्जीवित केली जाईल. यामुळे विद्यार्थी आत्मबल आणि क्षात्रतेज संपन्न होतील.

 

७ इ. शैक्षणिकदृष्ट्या भावी हिंदूराष्ट्र

हिंदूराष्ट्रात भारताच्या प्राचीन गौरवशाली इतिहासाचे पुनर्लेखन करून हिंदूंचा सत्य व राष्ट्रभक्‍ती अन् क्षात्रवृत्ती जागृत करणारा इतिहास शाळांतून शिकवला जाईल.

 

७ ई. भावी हिंदू राष्ट्रातील धर्मशिक्षण

शाळांमधून धर्मशिक्षण दिले गेल्याने भावी पिढी संस्कारित होईल.

 

८. सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

८ अ. सांस्कृतिकदृष्ट्या भावी हिंदूराष्ट्र

राष्ट्रीय वा विशेष दिन पाश्‍चात्त्य पद्धतींप्रमाणे नसतील, तर हिंदु संस्कृतीनुसार असतील, उदा. आर्थिक वर्षारंभ ‘१ एप्रिल’ ऐवजी ‘दिवाळीतील लक्ष्मीपूजन’ हा असेल.

 

८ आ. भावी हिंदु राष्ट्रातील कलाविकास

‘कलेसाठी कला’ नाही, तर ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’, असेल.

 

९. नैसर्गिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र

९ अ. नैसर्गिकदृष्ट्या भावी हिंदूराष्ट्र

जनतेवर पूर, दुष्काळ, भूकंप आदींसारखी नैसर्गिक संकटे ओढवू नयेत, यासाठी पर्यावरण आणि निसर्ग यांचे हित लक्षात घेऊन नियम केले जातील

 

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात समाजात होत जाणारे विविधांगी आमूलाग्र पालट

वर्ष २०२३ भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन होईल. त्यानंतर पुढील ५० वर्षांत हिंदु समाजात विविधांगी आमूलाग्र पालट होतील. हे पालट अभ्यासल्यानंतर हिंदु राष्ट्रातच मानवाची खरा विकास किंवा प्रगती होईल, असे आज म्हणता येईल.

 

१. सामाजिक समस्यांचे निर्मूलन

१ अ. गुंडगिरी, चोर्‍या, दरोडे, हत्या, बलात्कार आदी गुन्हेगारीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.

१ आ. उपासमारी, कुपोषण आदींचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.

 

२. प्रशासकीय कार्यक्षमतेचे वर्धन

२ अ. प्रशासन कार्यक्षम झाल्याने शासकीय कार्यालयांतील कामे तत्परतेने होतांना दिसतील.

२ आ. नगरे (शहरे), गावे, नद्या आणि जलाशय स्वच्छ दिसतील.

२ इ. गावागावांत खड्डेविरहित रस्ते दिसतील.

२ ई. सर्वत्र वीज उपलब्ध झाल्याने प्रत्येक घर रात्री प्रकाशमान दिसेल.

 

३. आर्थिक सुधारणा

३ अ. देश टप्प्याटप्प्याने स्वावलंबी होत गेल्याने परदेशी उत्पादनांची आयात न्यून होईल.

३ आ. देशाची अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सबळ होऊन भारतीय चलन अमेरिकी डॉलरच्या मूल्याएवढे वधारेल.

 

४. पर्यावरणाचे रक्षण

४ अ. कचरा, ध्वनी, जल, वायू आदी प्रदूषणाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने न्यून होत जाईल.

४ आ. गोहत्या रोखल्या गेल्यामुळे मूकपणे आसवें गाळणार्‍या गायी आनंदाने हंबरतील.

४ इ. किरणोर्त्सगामुळे लोप होत चाललेला पशू-पक्ष्यांचा किलबिलाट पुनश्‍च ऐकू येईल.

४ ई. निसर्ग टप्प्याटप्प्याने अनुकूल होत गेल्याने भूमी सुजलाम आणि सुफलाम् झालेली दिसेल.

 

५. हिंदु संस्कृतीचे संवर्धन

५ अ. देवभाषा संस्कृतचे पुनरुज्जीवन झाल्याने संस्कृतमध्ये संभाषण होतांना दिसेल.

५ आ. घरोघरी भिंतींवर कॅलेंडर नाही, तर हिंदु पंचांग दिसू लागतील.

५ इ. उषःकाली वेदमंत्रांचे उच्चार, भक्तीगीते आदी ऐकू येतील.

५ ई. सार्वजनिक उत्सव आणि सण अनुचित प्रकारांविरहित आणि भक्तीभावाने साजरे होतांना दिसतील.

 

६. मानवी जीवनाचा विकास

६ अ. सर्व नागरिक टप्प्याटप्प्याने धर्माचरणी बनून नंतर साधकवृत्तीचे बनतील.

६ आ. घरोघरी आयुर्वेदाचा प्रसार झाल्याने निरोगी जीवन जगता येईल.

 

– (प.पू) डॉ. आठवले (६.११.२०१४)

 

हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी योगदान द्या !

हिंदूंनो, ईश्‍वरी आशीर्वादामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन पर्वताला गोप-गोपींनी काठ्या लावल्या, त्याप्रमाणे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या क्षमतेनुसार कृती करण्यास आरंभ करा अन् ईश्‍वरी कृपा संपादन करा !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान द्या !
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान द्या !

‘हिंदू राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनीन’, अशी प्रतिज्ञा करून प्रत्येकाने त्याप्रमाणे कार्यरत होणे अत्यावश्यक आहे. – प.पू. डॉ. जयंत आठवले, सनातनचे प्रेरणास्थान.

हिंदु राष्ट्रात रामराज्य असल्याने त्यात निवडणुकांची आणि त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची आवश्यकता असणार नाही. – प.पू. डॉ. जयंत आठवले

 

ईश्‍वराचा आशीर्वाद असल्याने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे उच्च ध्येय बाळगून त्याकडे मार्गक्रमण करणारे सनातनचे साधक !

राजकारणी सनातनचे साधक
१. जीवनाचे ध्येय अधिकाधिक सत्ता, तसेच धन प्राप्ती करणे इत्यादी ईश्‍वरप्राप्ती
२. वृत्ती प्रत्येक गोष्टींत स्वार्थ पहाणे अधिकाधिक त्याग करणे
३. स्वभावदोष अनेक अल्प
४. अहं तीव्र अल्प
५. साधना करत नाहीत करतात
६. प्रेम स्वार्थासाठी प्रीती हा स्वभाव झाल्यामुळे सर्वांवर प्रेम करतात
७. व्यक्तीतील त्रिगुणाचा स्तर तम-रज सत्त्व-रज
८. कार्याचा स्तर मानसिक आध्यात्मिक-मानसिक
९. आध्यात्मिक उन्नती अधोगती होणे उन्नती होणे
१०. कार्यातील व्यापकत्व स्वत:च्या कार्यकर्त्यांचे व्यावहारिक हित पहाण्याएवढेच अखिल मानवजातीचे सर्वांगीण कल्याण करण्याची तळमळ
११. ईश्‍वराचा आशीर्वाद न मिळणे मिळणे

 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.४.२०१५)

Leave a Comment