सनातन संस्थेच्या वतीने आयोजित युवा शिबीरात सहभागी झालेल्यांचा धर्मप्रसाराच्या कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचा निर्धार !

सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे युवा शिबीर !

१. सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्यासमवेत शिबिरात सहभागी युवक-युवती

जळगाव – सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या सेवा केंद्रात चार दिवसीय ‘युवा शिबिर’ पार पडले. या शिबिराला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, अहमदनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतून २८ युवक-युवती सहभागी झाले होते.

शिबिरात दैनिक सनातन प्रभातचा अभ्यास कसा करावा ?, राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर कसा करावा ?, नियतकालिक सनातन प्रभातचे वर्गणीदार कसे करावे ?, ग्रंथप्रदर्शन कसे लावावे ?, व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व, स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी ? भावप्रयोग कसे करावेत ? आध्यात्मिक उपाय कसे करावेत ? सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत राबवले जाणारे विविध उपक्रम समाजापर्यंत कसे पोहोचवावे ? प्रभावी वक्ता कसे व्हावे ? बातमी कशी सिद्ध करावी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

पूर्वीपेक्षा प्रतिदिन व्यष्टी अन् समष्टी साधनेला अधिक वेळ देणार असून आत्मसात कौशल्यांचा धर्मकार्यासाठी वापर करणार असल्याचे मनोगत उपस्थित युवक-युवतींनी व्यक्त केले.

शिबिरात सहभागी झालेल्या युवा साधकांचे मनोगत

१. कु. सायली पाटील, जळगाव – शिबिरात येण्यापूर्वी मनाची नकारात्मक स्थिती होती. शिबिरात आल्यावर नकारात्मकता अल्प झाली. व्यष्टी साधनेचे प्रयत्न बंद झाले होते. आता पुन्हा व्यष्टीची घडी बसवूया, असे वाटले. पूर्वी केवळ स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची सेवा करत होते, आता इतर पण सेवा करूया, असे वाटते.

२. श्री. जयेश पाटील, नंदुरबार – शिबिरात येण्यापूर्वी २ दिवस आजारी होतो. पण आश्रमात प्रवेश केल्यावर आजारी आहे, असे वाटलेच नाही.

३. कु. जुही भुरे, नाशिक – इकडे आल्यावर महाविद्यालयातील कोणतेच विचार मनात आले नाहीत. मन शांत आणि स्थिर होते. नंतर महाविद्यालयामध्ये शिक्षक आले नसल्याने प्रायोगिक भाग झालाच नाही, असे कळले आणि माझा अभ्यास बुडू नये याची देवानेच काळजी घेतली.

४. कु. चंदना थोरात, नाशिक – शिबिरात येण्यापूर्वी शिबिरात जायला नको, असे वाटत होते; पण शिबिरात आल्यानंतर साधनेचे महत्त्व शिकायला मिळाले आणि पूर्णवेळ साधक होण्याची इच्छा झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment