प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट
इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

पिप’ तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणारे परीक्षण
‘अनन्त संसार समुद्र तार नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्याम् ।
वैराग्य साम्राज्यद् पूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम् ॥
                                               – गुरुपादुकाष्टकम्, श्‍लोक १

अर्थ : संसाररूपी (मायारूपी) अनंत समुद्र पार करण्यास साहाय्य करणारी नौका असणार्‍या, गुरूंप्रती भक्ती निर्माण करणार्‍या आणि ज्यांच्या पूजनाने वैराग्य प्राप्त होते, अशा गुरुपादुकांना माझा नमस्कार असो.

वरील श्‍लोकात आद्यशंकराचार्यांनी गुरुपादुकांचे साधकाच्या जीवनातील महत्त्व यथार्थपणे वर्णिलेे आहे.

येथे सर्वसाधारण (कोणीही न वापरलेल्या) पादुका, तसेच मध्यप्रदेशातील इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचा त्यांच्या भोवतीच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. या चाचणीतून संतांच्या पादुकांचे, पर्यायाने संतांचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येवो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

१. वैज्ञानिक चाचणी करण्यात आलेल्या पादुका

१ अ. सर्वसाधारण पादुका

पूजेच्या उद्देशाने बनवलेल्या या पादुका सुबक आहेत. या पादुका कोणीही वापरलेल्या नसल्याने त्यात कोणत्याही व्यक्तीची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी स्पंदने नाहीत.

१ आ. संतांनी वापरलेल्या पादुका

हे दोन्ही संत एकाच गुरुपरंपरेतील असल्याने त्या गुरुपरंपरेविषयी आणि संतांविषयी संक्षिप्त माहिती पाहूया. आद्यशंकराचार्यांनी स्वतः स्थापलेल्या चार मठांपैकी बद्रिनाथ मठाच्या अंतर्गत असलेला ‘आनंद संप्रदाय’ तोटकाचार्य यांच्या हाती सोपवला होता. याच परंपरेत श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद झाले. त्यांचे शिष्य श्री अनंतानंद साईश (देहत्याग : १२.१२.१९५७) होत. हे मूळचे राजस्थानमधील उदयपूरजवळील उमेठ गावचे होते. बालपणापासून त्यांना देवाचे वेड होते. इंदूरच्या ‘होळकर स्टेट’मध्ये नोकरीला असतांना त्यांच्यातील गुणांमुळे ते लवकरच श्रीमंत शिवाजीराव होळकर महाराजांचे विश्‍वासू बनले. तेथेच ते प्रथम प.पू. चंद्रशेखरानंद परमहंस यांच्या संपर्कात आले. नंतर मध्यप्रदेशातील मांधाता येथील संस्थानिकांचे सल्लागार म्हणून काम पहात असतांना त्यांचे गुरु प.पू. चंद्रशेखरानंद परमहंस यांच्याशी त्यांची पुन्हा भेट झाली. श्री अनंतानंद साईश श्रीमत्परमहंसांंची तन-मनाने रात्रंदिवस सेवा करत असत. त्यांची सेवाभक्ती पाहून एक दिवस श्रीमत्परमहंसांनी त्यांना गुरुमंत्र दिला. गुर्वाज्ञेने श्री साईश यांनी अज्ञातस्थळी राहून तपश्‍चर्या केली. त्यानंतर त्यांनी रेवातटी (रेवा म्हणजे नर्मदा) ४० वर्षे राहून कठोर साधना केली.

१ आ १. अल्पावधीतच गुरूंचे मन जिंकून अनेकांना अध्यात्माकडे वळवणारे प.पू. भक्तराज महाराज (जन्म : ७.७.१९२०. देहत्याग : १७.११.१९९५)

हे प.पू. श्री अनंतानंद साईश यांचे शिष्य आणि मध्यप्रदेशातील इंदूर येथील सुप्रसिद्ध संत होते. दिनकर सखाराम कसरेकर हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होय. बालपणापासूनच यांची अध्यात्माकडे ओढ होती. ते दत्तभक्त होते. गुरुप्राप्तीपूर्वी त्यांनी साधना म्हणून श्री गुरुचरित्राची असंख्य पारायणे केली होती.

९.२.१९५६ या दिवशी त्यांना त्यांचे गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश यांचे प्रथम दर्शन झाले. ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ, गुर्वाज्ञापालन, गुरुसेवा, गुरूंवरील श्रद्धा आदी उत्तम शिष्याच्या अनेक गुणांमुळे दिनकरने अल्पावधीतच गुरूंचे मन जिंकले. गुरूंनी त्यांचे ‘भक्तराज’ असे नामकरण केले आणि पुढे ते ‘संत भक्तराज महाराज’ या नावाने प्रसिद्ध झाले.

प.पू. भक्तराज महाराज यांनी भजन, भ्रमण आणि भंडारा या माध्यमांतून अध्यात्माचा प्रसार केला. अक्षरशः लक्षावधी किलोमीटरची भ्रमंती करून त्यांनी भजनांच्या माध्यमातून अनेकांना अध्यात्माकडे वळवले. सनातन संस्थेचे संस्थापक आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ते गुरु होत.

१ आ २. प.पू. भक्तराज महाराज यांच्यासोबत सावलीसारखे राहून गुरुसेवा करणारे प.पू. रामानंद महाराज (जन्म : २०.१०.१९२४. देहत्याग : ११.३.२०१४) !

यांचे पूर्वाश्रमीचे नाव रामचंद्र लक्ष्मण निरगुडकर. हे प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरुबंधू होते. ते मूळचे नाशिक येथील. पुढे ते मध्यप्रदेशातील इंदूर येथे स्थायिक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी १९४८ ते १९६४ या काळात पुष्कळ कार्य केलेे. १९४८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. तेव्हा त्यांनी दोन मास कारावासही भोगला होता.

गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश यांची त्यांनी मनोभावे सेवा केली. गुरूंच्या देहत्यागानंतर प.पू. भक्तराज महाराज यांना गुरुस्थानी मानून त्यांच्यासोबत सावलीसारखे राहून त्यांनी गुरुसेवा केली.

प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे नामकरण ‘रामानंद’ असे केले आणि त्यांना उत्तराधिकारी म्हणून नेमले. प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. रामानंद महाराज यांच्या अवस्थेचे वर्णन ‘स्थितप्रज्ञ’ असे केले आहे. त्यांनी लक्षावधी किलोमीटर भ्रमंती करून भजनांच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रसार केला.

प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या पादुका

 

प.पू. रामानंद महाराज यांनी वापरलेल्या पादुका

 

२. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण

टीप १ : पादुकांच्या प्रभावळीची तुलना मूलभूत नोंदीशी केली आहे.

३. निष्कर्ष

सर्वसाधारण (कोणीही न वापरलेल्या) पादुकांमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा वाढली आहे; पण या पादुकांची रचना सात्त्विक असल्याने त्यांत अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जाही आहे.

दोन्ही संतांच्या पादुकांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात घटली आणि सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, संतांच्या पादुकांमध्ये चैतन्य असते. हे चैतन्य भावपूर्ण उपासनेने टिकून रहाते अन् वृद्धिंगत होते. अशाप्रकारे संतांच्या देहत्यागानंतर ते स्थूलदेहाने प्रत्यक्षात नसतांनाही त्यांच्या पादुकांच्या माध्यमातून संतांमधील चैतन्याचा लाभ भाविकांना होत असतो. त्यामुळे हिंदु संस्कृतीत गुरूंच्या आणि संतांच्या पादुकांचे पूजन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. ही पद्धत कशी योग्य आहे, हे या वैज्ञानिक चाचणीतून सिद्ध होते.’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१९.१२.२०१४)

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment