हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्यातच मनुष्य जीवनाची सफलता ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

चुनाभट्टीतील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

सभेला उपस्थित धर्मप्रेमी

 

सौ. नयना भगत

चुनाभट्टी (मुंबई), २७ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु धर्माची श्रेष्ठता ही गुरु-शिष्य परंपरेतच आहे. जेव्हा जेव्हा आपल्या धर्माला, राष्ट्राला ग्लानी आली, तेव्हा तेव्हा गुरु-शिष्य हीच सनातन धर्मपरंपरा वाचवण्यासाठी पुढे आले. अर्जुन-भगवान श्रीकृष्ण, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, रामकृष्ण परमहंस- स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज-समर्थ रामदासस्वामी ही प्रसिद्ध उदाहरणे आहेत. आजही हिंदु संस्कृतीवर परंपरेवर आक्रमण केले जात आहे. यामुळेच हिंदु धर्म धोक्यात आला आहे. संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती होत आहे. त्यामुळे हिंदु धर्माचे धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यानेच जीवन सफल होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. चुनाभट्टी येथील साईबाबा मित्रमंडळाच्या मैदानात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या.

सभेचे सूत्रसंचालन समितीच्या सौ. ममता देसाई यांनी केले. शंखनादानंतर दीपप्रज्वलन झाले. यानंतर मुरलीधर मंदिराचे पुरोहित वेदमूर्ती श्री. प्रज्ज्वल टेंबेकर आणि श्री. अनिकेत लेले यांनी वेदमंत्रपठण केले. त्यांचा सत्कार समितीचे श्री. संदीप शिंगाडे यांनी केला.

सौ. भगत पुढे म्हणाल्या, ‘‘आमच्या हातात सायंकाळी दीपज्योतीचा दिवा असण्याऐवजी रिमोट असतो. या दूरचित्रवाहिनीमुळे राष्ट्र, धर्म, समाज, कुटुंब, आणि वैयक्तिक कोणाचेही भले होत नाही; मात्र आम्ही याद्वारे जिहादचे शिकार बनत आहोत. १४ प्रकारचे जिहाद, देवनिधीमध्येही भ्रष्टाचार करणारे राजकारणी, भोंदु आधुनिकतावादी, पुरोगामी आणि खोट्या स्त्री-पुरुष समानतेद्वारे हिंदु धर्माची अपकीर्ती करणारे नास्तिक या सर्वांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. यासाठी हिंदूंनी आता झोपेचे सोंग सोडून जागृत व्हावे, तरच सर्वांचे कल्याण होईल.’’

धर्माचा विजय होतो आणि अधर्माचा पराजय हीच शाश्‍वत नीती ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

संविधानात धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द घुसडले तेव्हापासूनच हिंदूंची दूरवस्था चालू झाली. संविधानात धर्मनिरपेक्षतेची नीटशी व्याख्याही नाही; मात्र याचा तोटा सर्वांत अधिक हिंदूंनाच झाला आहे. ‘कायदा हिंदूंना, फायदा अन्य धर्मियांना’, असे झाले आहे. ८२६ कोटी रुपये मुसलमानांच्या हजयात्रेला जातात आणि हिंदूंना काशी, प्रयाग कुंभसाठी अतिरिक्त भार द्यावा लागतो. ‘अच्छे दिन’वाल्या सरकारने हजचे हे लाड बंद केले; मात्र लगेच शादीशगुन योजना आणून प्रत्येक मुसलमान युवतीस १८ सहस्र रुपये देण्याचा घाट का घातला ? हिंदूंना मुली नाहीत का ? हिंदूंना १० दिवस सण असले की, रात्री १० नंतर ध्वनीक्षेपक नको आणि हेच ३६५ दिवस मशिदीतील भोंगे पहाटे ५ वाजल्यापासून वाजवले जातात. पोलीस न्यायालयाचा निर्णय ऐकत नाहीत. केवळ हिंदूंनाच धाक दाखवतात. ‘पहिले ’डोनेशन’, मग ‘ऍडमिशन’ नंतर शेवटी थोडे ‘एज्युकेशन’ हे कॉन्व्हेंट ख्रिस्ती शाळांचे गणित ‘मातृदेवोभव- पितृदेवोभव’ शिकवू शकणार नाही. कॉन्व्हेंट शाळा केवळ ‘नोकर’ घडवणार. मालक बनवण्याची पात्रता हिंदूंच्या गुरुकुल पद्धतीतच होती, हे लक्षात घेतले पाहिजे. पूज्यपाद संतश्री आसाराम बापूजींना एका खोट्या बलात्काराच्या खटल्यामध्ये वर्षानुवर्षे कारावास; मात्र केरळचा बिशप हा ननवर अत्याचार करूनही २ दिवसांत जामिनावर बाहेर येतो. राममंदिरावर निर्णय द्यायला न्यायालयाला वेळ नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. ‘तारखेवर तारीख’ अशी व्यवस्था कधी न्याय देणार ? संतांच्या भाकितानुसार वर्ष २०२३ ला हिंदु राष्ट्र येणारच आहे. तेव्हा साधना म्हणून आपण यात तन-मन-धनाने समर्पित होऊया. यानेच आपला उद्धार होईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment