सनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांनी रेखाटलेली श्री गणेशाची विविध रूपांतील चैतन्यदायी चित्रे

चित्रकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी वर्ष २०१३ मध्ये श्री गणेशाची विविध रूपांतील ८ चित्रे रेखाटली होती. कलेचे कोणतेही लौकीक शिक्षण न घेताही त्यांनी अत्यंत सुबक चित्रे रेखाटली. त्या चित्रांपैकी काही चित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत. केवळ त्यांच्यातील ईश्‍वराप्रतीच्या भावामुळे ही चित्रे पहाणार्‍याची भावजागृती होते. ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने निर्माण झालेली आणि ईश्‍वराशी (ईश्‍वराच्या गुणांशी) एकरूप होण्यास साहाय्यभूत होते, तीच खरी कला !

 

सिंहासनावर विराजमान गणराज

 

सिंहासनारूढ गणराजाचे राजस रूप ! : येथे श्री गणेश सिंहासनावर विराजमान होऊन ‘गणराज’ झाला आहे. छत्र असलेले सिंहासनाधिष्ठित असलेले त्याचे हे रूप फारच राजस आहे. अशाच प्रकारे श्री गणेश भक्तांच्या हृदय-सिंहासनावरही विराजमान आहे.

 

शस्त्रे धारण केलेला श्री गणेश

श्री गणेशाच्या हातांत नेहमी पाश आणि अंकुश ही शस्त्रे असतात; परंतु आवश्यकता भासल्यास श्री गणेश हाती धनुष्यबाण घेऊन अचूक शरसंधानही करू शकतो. सर्वच देवता सर्व शस्त्रे चालवण्यात निपुण असतात.

Leave a Comment