काही विशिष्ट हेतूंसाठी श्री गणेशाची उपासना करतांना म्हणावयाचे मंत्र !


Shriganapati
 

श्री गणपति

 

१. संतान गणेश

‘संतान प्राप्तीसाठी या गणेशाची प्रार्थना केली जाते.

१ अ. प्रार्थना करतांना जपावयाचा मंत्र

 सन्तानगणपतये नमः ।’

 

२. उच्छिष्ट गणपति

‘आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत’, असे वाटणे, याला ‘उच्छिष्ट’ म्हटले जाते. या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्रनाश, निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती, लक्ष्मीप्राप्ती, तसेच आलेल्या संपत्तीचा योग अन् विनियोग, या गोष्टी उच्छिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात. सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी याची साधना करणे चांगले आहे.

२ अ. गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र

‘ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नोदन्ती प्रचोदयात् ॥

 

३. विघ्नहर्ता गणेश

‘संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणे’, हा या गणेशाच्या उपासनेमागील हेतू आहे. या गणपतीची प्रतिमा आपल्या घरात लावून त्याचे आवाहन आणि पूजन केल्यास तो आपल्या भक्तांच्या साहाय्याला धावून येतो.

३ अ. गणेशाच्या आराधनेचा मंत्र

‘ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नोविघ्नः प्रचोदयात् ॥’

 

४. चिंतामणी गणेश

आज प्रत्येक व्यक्तीला, मग ती श्रीमंत किंवा गरीब असो, कुठलीतरी चिंता असतेच. ‘मला कुठलीही चिंता नाही’, असे म्हणणारी व्यक्ती सापडणे अशक्य ! व्यक्तीला विविध चिंता भेडसावत असतात. कोणाला व्यापार, अभ्यास, संपत्ती, स्वास्थ्य, लग्न किंवा संतानप्राप्ती अशा प्रकारची काळजी असते, तर कोणाला आपल्या लहान मुलांच्या भवितव्याची काळजी असते. अशा चिंतांचे निर्मूलन करण्यासाठी आपण ‘चिंतामणी’ गणेशाची आराधना करावी.

४ अ. आराधनेचा मंत्र

यासाठी ‘ॐ नमो विघ्नहराय गं गणपतये नमः ।’ हा मंत्र ११ वेळा जपावा.

 

५. विद्याप्रदायक गणपति

ज्या घरात मुले उद्धट आहेत, ज्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आणि केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात रहात नाही, त्या घरातील कुटुंबप्रमुखाने आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर शुभ मुहूर्तावर विद्याप्रदायक गणेशाची मूर्ती स्थापन करावी.

५ अ. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर म्हणावयाचे मंत्र

‘ॐ ज्ञानरूपाय नमः ।, ‘ॐ विद्यानिर्हाय नमः ।, ‘ॐ विद्याधनाय नमः । आणि ‘ज्ञानमुद्रावते नमः ।’

(संदर्भ : मासिक ‘विवेक’, १८.९.२००५)
  • श्री गणेशाची दोन स्तोत्रे सर्वपरिचित आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘संकष्टनाशन स्तोत्र’. या स्तोत्राची रचना देवर्षि नारद यांनी केली आहे. यात श्री गणेशाच्या १२ नावांचे स्मरण केले आहे. या स्तोत्राचे पठण सकाळी, माध्यान्ही आणि सायंकाळी केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 
  • ‘गणपति अथर्वशीर्ष’ हे श्री गणेशाचे दुसरे सर्वपरिचित स्तोत्र आहे. ‘अथर्वशीर्ष’ यातील ‘थर्व’ म्हणजे ‘उष्ण.’ ‘अथर्व ‘ म्हणजे ‘शांती’ आणि ‘शीर्ष’ म्हणजे ‘मस्तक’. ज्याच्या पुरश्‍चरणाने शांती लाभते, ते म्हणजे ‘अथर्वशीर्ष’. हे स्तोत्र गणकऋषि यांनी रचले आहे. अथर्वशीर्षात प्रथम श्री गणेशाची स्तुती केली असून नंतर त्याचे ध्यान केले आहे. अथर्वशीर्षाचे पठण केल्याने सर्व विघ्ने दूर होतात आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते. 

Leave a Comment