सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप ! – अधिवक्ता प्रशांत गोरे, अकोला

सातव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत ‘अधिवक्ता अधिवेशना’च्या द्वितीय दिवशी मान्यवरांनी केलेले ओजस्वी मार्गदर्शन !

धर्मकार्यासाठी एक पाऊल टाकल्यास देव साहाय्य करतोच !

अधिवक्त्यांचे संघटन करतांना आलेले अनुभव सांगतांना अधिवक्ता प्रशांत गोरे म्हणाले, ‘‘अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम येथे अधिवक्त्यांसाठी अधिवेशन आयोजित करतांना ‘धर्मकार्यात एक पाऊल टाकल्यास देव साहाय्य करतोच’, अशी अनुभूती घेतली. अधिवेशनासाठी आलेल्या अधिवक्त्यांनी त्यांच्या भागांतही प्रांतीय अधिवेशन आयोजित करण्यासाठी प्रयत्न करावेत.’’

अधिवक्ता प्रशांत गोरे यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले
आणि रामनाथी येथील सनातनचा आश्रम यांच्याप्रती असलेला भाव !

अधिवक्ता प्रशांत गोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ करतांना विष्णुस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून केला. त्यांच्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ‘‘सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप आहे. या वैकुंठाची अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे. प.पू. डॉक्टर हे विष्णुस्वरूप गुरुमाऊली आहेत. कार्य करतांना साधकांना भेटल्यावर आनंद आणि चैतन्य यांची अनुभूती येते.’’

अधिवक्ता प्रशांत गोरे अत्यंत नम्रतेने बोलत होते. त्यांच्या बोलण्यात कृतज्ञता भाव जाणवत होता. सनातनचे संत पू. पात्रीकर यांच्याप्रतीही त्यांचा भाव आहे.

Leave a Comment